Posts

Showing posts from August, 2024

मातृदिन श्रावणी पोळा.

मातृदिन पोळा  श्रावण वद्य अमावस्येला दर्भ ग्रहणी अमावस्या म्हणतात. त्यादिवशी दरबा उपटून आणायचे, असे हरित ने हेमाद्री मध्ये म्हटले आहे. त्या दिवशी आणलेले दरव मी सत्व होत नाहीत. म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असतील त्या दिवशी उपयोगात आणू शकतो. ह्या दिवशी पिठोरीवृत्त करायचे. हे वृत्त खानदेश व मध्य प्रदेशात 'पोळा' नावाने प्रसिद्ध आहे. हा व्रताचा संकल्प खालील प्रमाणे आहे :  'मम इह जन्मानी जन्मांतरे वा सौभाग्यपुत्रपौत्रफलावाप्यर्थ पिठोरेवृत्त करिष्य|  मला ह्या जन्मात अथवा जन्म जन्मांतराच सौभाग्य, पुत्र व पवित्र यांचे फल प्राप्त व्हावे यासाठी मी पिठोरीवृत्त करीन.'      स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र- पौत्रवती बनवणारी ही अमावस्या 'मातृदिन' म्हणून ओळखली जाते. एका स्त्रीचा पुत्र मुक्त जन्माला होता. म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेऊन स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा, अशी प्रत्येक प्रार्थना केली. तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनींच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला. असे भविष्य पुराणात एक कथा आहे.      ह्या कथेचे सार समजून घेण्याचा प्र...

जसा संकल्प तशी सृष्टी.

विचार एक शक्ती      आपल्याला गीतेत समजावल आहे; म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो पण भगवंताचा मुलगा आहे. असा असला पाहिजे तर दिवाळीच दिवाळी आहे. अशी दिवाळी करण्यासाठी काय केले पाहिजे? विचार परिवर्तन केले पाहिजे, विचारात खूप मोठी शक्ती आहे. आज विचार क्रांती होत नाही. विचार क्रांती ही पहिली पायरी आहे. मग भावक्रांती आणि नंतर आचार क्रांती असा त्याचा रस्ता आहे. जोपर्यंत विचार बदलत नाहीत तोपर्यंत काहीच बदलणार नाही. विचार क्रांती झाली पाहिजे. विचार ही पहिली पायरी.

श्रीकृष्ण

Image
भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी संस्कृतीचा नि:ष्पृह, निरंकारी व नम्र उपासक. संस्कृतीसाठी त्याच्या आतड्या तुटत होते. म्हणूनच तर दुर्योधन, कंस, कालवन, नरकासुर, शिशुपाल व जरासंघ यांच्यासारखे जडवादी, असुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नुसत्या करीत होते तेव्हा धर्म व नेते यांचे सुदर्शन चक्र हातात घेऊन त्याने या षडरिपूंचा नाश केला. संस्कृती प्रेमी पांडवांना तो नेहमीच मार्गदर्शक राहिला. अर्जुनाच्या रथाप्रमाणे त्यांचा जीवन रथही प्रभुत सांभाळत होता. अटीतटीच्या प्रसंगात आणि अतिशय वाईट काळात त्याने बांधवांना सावरलेला आहे.       'वैयक्तिक प्रतिज्ञा व निष्ठा यांनी कार्यालहाने पोहोचत असेल तर कार्यरक्षणामुळे वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिज्ञानामुळेच महत्त्व देऊ नका' असा एक सुंदर सिद्धांत त्याने पांडवांना समजावला होता. त्या सिद्धांताच्या आचरण करूनच पांडवांचा विजय झाला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन युधिष्ठिराला 'नरो वा कुंजरो वा' बोलावे लागले, भिमाचा दुर्योधना बरोबर च्या गदायुद्धात भीम नियमाविरुद्ध जाऊन दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारतो; अर्जुन कार्णाच्या रथाचे चाल जमिनीत होते त्यावेळी नि:श...

भगवान श्रीकृष्ण अवतार.

Image
भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर वस्तू संबंधित बनवले होते की, जो कोणी त्याच्याकडे पाहिल त्याला तो आपला वाटत होता. वृद्धांना स्वतःच्या मुलासारखा वाटत होता. तरुणांना मित्र वाटत होता. राजांना तो राजासारखा वाटत होता तर भक्तांना स्वयं भगवान वाटत होता. सर्वांना त्याच्यावर प्रेम करण्याचा उमाळा येत होता. आजही आपणाला कृष्ण तेवढाच आकर्षक वाटतो. रोज नि रोज तोच सूर्य उगवतो पण केवढा आनंद होतो! पक्षी तेवढाच आनंदाने किलबिल करतात. गोकुळाष्टमी तशीच प्रत्येक वर्षी येते पण केवढा आनंद देते! कृष्णाचे जीवनच तसे आहे. गोकुळाष्टमी म्हणजे प्रभू प्रेमिकांच्या आनंदाची पराकाष्ठा.      कृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले होते. सामान्य लोकांत त्याने आत्मप्रत्ये उभा केला. गवळ्यात मिसळून त्यांना धर्मयुद्ध जागविले. त्याने आधारुर्व बकासुर यांना मारले. अद म्हणजे पाप व बक म्हणजे दंभ. गोकुळातील पापी विचारांच्या व धम्मिवृत्तीच्या लोकांचा त्याने नाश केला. कालिया हा नाग जातीचा होता. स्वतःच्या विषारी व विकारी विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना त्रास देत होता. त्या...

गोकुळाष्टमी

Image
गोकुळाष्टमी   कृष्णपक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन, पाय वाकडा ठेवून, शरीराला कमनीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधर आणि ज्या दिवशी संसारात पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर झाला आहे. मेघांचा गडगडात होत आहे, बिजली कडकडत आहे, मुसळधार पाऊस पडत आहे अशावेळी श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. जेव्हा जीवनात अंधार दाटतो, निराशेचे उदास वातावरण पसरते, आपत्तीचा पाऊस पडतो, दुःख-दैन्याचे काळे मेघ धमकी देत गडगडाट करतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जन्म घेतो. व्याप्त अंधारात जेव्हा प्रकाश- किरण दिसतात, उषाकालचा रवी जेव्हा स्वतःची आभा पसरवितो त्यावेळी कोणाचे ह्रदय आनंदाने पुलकित होणार नाही? साम्राज्यवादाच्या चंद्राचेंगरी चिरडल्या जाणाऱ्या समाजाला जेव्हा तारणारा भेटतो, सत्ता व संपत्ती यांच्या शोषणापासून सोडवणारा मुक्तिदाता मिळतो, गरीब व उपेक्षितांना सहानुभूती देणारे उद्धार हृदय मिळते, पडलेल्याला उभा होण्यासाठी आसरा मिळतो आणि अध्यात गटांगळ्या खाणाऱ्याला एखादा उद्धारक मिळतो त्यावेळी आनंद विभोर बनवून कोण नाचणार नाही? सर्वच नाचतील. मुक्तिदात्या, गीतेच्या उदगात्या, लोकांना तारणा...

क्रियासिद्धी - रावण आणि राम यांच्यातील a look

क्रियासिद्धी     रावणाला जसा अहंकार होता तशी रामाला सुद्धा मीजास होती.    विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधि:  विपक्ष: पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपय:|  तथाप्येको राम: सकलमवधिद्राक्षसकूम्  क्रियासिद्धी: सत्वे भवति महातां नोपकरणे|| रामाला सागर पार करून लंका जिंकायची होती. विपक्षात रावण होता आणि रणभूमीवर रामाचे सहाय्यक होते वानर, तरीही एकट्या रामाने समग्र राक्षस कुळाचा संहार केला. महापुरुषांची सिद्धी साधनांमध्ये नसते, त्यांच्या सत्वात असते. लंका हे काही लहान सान राष्ट्र नव्हते. त्याकाळचे ते अतिशय समर्थ राष्ट्र गणले जाई. त्याच्याकडे सर्वच प्रकारचे शस्त्र होती. त्याच्या समोर नजर वर करून बघण्याची कोणाची ताकद नव्हती. अशा समर्थ राष्ट्राचे आणि बलवान रावणाशी लढून त्याचा पराभव करणे सोपे नाही, असा विचार करून कोणत्याही माणसाने लढायचा विचार सोडून दिला असता. परंतु राम अशी माघार घेणाऱ्यापैकी नव्हता. 'मी नाही लढणार तर दुसरा कोण लढणार? मीच लढणार आणि रावणाचा पराभव करणार.' असे बोलणारा राम आणि 'मीच लढून रामाचा पराभव करणार असा बोलणारा रावण होता. थोडा देखील पूर्वग्रह न बाळगता त...

पतिव्रता स्रीच्या जीवनात पतिचे असलेले महत्त्व.

Image
  निर्भय   'मी कोणाचा तरी आहे' हे जिने मान्य केले ती व्यक्ती निर्भय असते. वेश्या कोणाचीच नसते म्हणून ती कोणाला उलट- सुलट उत्तर देत नाही परंतु पतिव्रता स्री कोणाची तरी आहे, तिने स्वतःवर पतीचा शिक्का मारला आहे. ती पतीच्या नावाने कुंकू लावते. तेव्हा वाटेल तेवढा मोठा माणूस तिच्या घरी आला आणि तिच्या पतीची चौकशी करू लागला तर 'ते घरी नाहीत' सांगून झटकन दरवाजा बंद करते, कारण आलेल्या माणसाची तिला गरज नसते. दरवाजा बंद करताना तिच्या मनात विचार येत नाही की त्या माणसाला काय वाटेल? त्याचप्रमाणे ज्या लोकांनी स्वतःवर भगवंताच्या नावाची मोहर उठवली त्यांची मस्तीच काही वेगळ्या प्रकारची असते. ती मस्ती ही काही भगवद्भक्तीची आहे. भक्तीची देखील नशा असते, पण ती दैवी नशा असते.           

चित्त एकाग्र कसे करावे आणि त्यांचे फायदे.

Image
एकाग्रचित्त ज्याला चित्त एकाग्र करायचा आहे त्याने स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे पाहत राहिले पाहिजे. म्हणजे ज्याला चित्त एकाग्र करायचा आहे त्यांनी स्वतःच्या नाकाला खूप सांभाळले पाहिजे. इहलोकातही व परलोकातही माणसाला नाक सांभाळता आले पाहिजे‌. नाक कापले न जावे याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या हातून काही उलट सुलट घडले तर दुसऱ्या माणसाला तोंड दाखवण्याची देखील आपल्याला शरम वाटते. मग कापले गेलेले नाक घेऊन भगवंताला तोंड दाखवताना किती लाज वाटली पाहिजे? हे तर शाळेत त्रैराशीक आहे. चित्त एकाग्र करायला बसल्यानंतर भगवंताकडे डोळ्याला डोळा भिडून पहायचे आहे. हा काही खेळ नाही. भगवंताच्या अति प्रभावी डोळ्यासमोर लाचार, दिन, दुबळा बनलेल्या आणि ज्याचे नाक कापले गेले आहे अशाची काय ताकद आहे की तो भगवंता समोर डोळ्याला डोळा भिडून पाहील? आमुकेक प्रकारचे जीवन जगला असेल तरच भगवंताकडे तो face to face पाहू शकेल. चित्त एकाग्र करतेवेळी दहा दिशांना काय चालले आहे ते पाहण्याचे कारण नाही. दिशाकडे पाहू नका याचा अर्थ डोळे बंद करा असा होतो. दहा दिशांना तोंड फिरवू नये हा अर्थ तर स्थिरतेत आलाच. तेव्हा पूर्व दिशेला त...

भगवंत कार्यात असणारे जे जीवन यशस्वीच असते.

Image
कार्य यशस्वी व्हावे अशी इच्छा बाळगणे ही वेगळी गोष्ट आहे. यश मिळालेले पाहून उत्साहाने धावणारे आसे वराती लोक कार्यात असू नयेत.       सामाजिक कार्याचा लोक रिपोर्ट छापतात. तो पाहिल्यावर लोक कार्यात रस घेतात. कार्यात यश मिळाले तर म्हणतात, 'आम्ही तुमच्याबरोबर आहोत' आणि अपयश मिळाले तर म्हणतात, 'आम्हाला पहिल्यापासूनच वाटत होते की या कार्यात काही दम नाही'. असे लोक कार्याला आपले मानत नाहीत. भगवंताचे कार्य हे माझे कार्य आहे, संस्कृतीचे कार्य आहे, अशी दृढतर भावना ज्यांची असेल अशा लोकांना पुण्य मिळते, त्यांचे जीवन यशस्वी होते.       प्रभूकार्यात यश मिळेल किंवा मिळणार देखील नाही, परंतु माणसाचा अध्यात्मिक विकास तर होतोच ही गोष्ट माणसे विसरून जातात. यश मिळाले नाही तर कार्य सोडून देतात किंवा कार्यातील त्यांची गति मंदावते. ज्याची कृती आणि विचार हे दोन पंख स्थिर असतील त्याचाच अध्यात्मिक विकास होऊ शकतो. म्हणून शरीराच्या स्थैर्यबरोबर आचार विचारांचे, कार्यांचे आणि उपास्यांचे, अशी तीनही स्थैर्य असायला हवीत.

अस्थिर विचारांची माणसे आणि त्यांचे अस्थिर जीवन.

अस्थिर विचारांची माणसे भगवंताजवळ बसण्याची सुरुवात करायची असेल तर माणसाने प्रथम स्थिर बसले पाहिजे, शरीराची हालचाल बंद राहिली पाहिजे.  जसे शरीराचे स्थैर्य हवे तसे विचारांच्या आणि उपास्यांचे स्थैर्य देखील हवे. या तिन्ही गोष्टीत माणुस स्थिर असला पाहिजे.           यौगिक प्रक्रियेत माणसाने शरीर, मान व माथें समांतर ठेवावे ही शारीरिक प्रक्रिया आहे. शारीरिक स्थैर्यासोबत विचारांचे स्थैर्य असणे आवश्यक आहे. अस्थिर आणि चंचल विचारांचा माणूस चित्त एकाग्रतेत पुढे जाणार नाही. त्याला क्षणात एखादी वस्तू आवडीनाशी होते तर क्षणात ती चांगली वाटते. वस्तू चांगली किंवा वाईट वाटण्यामागे त्यांच्याकडे काही खास कारणही नसते. अशा अस्थिर विचारांची माणसे भरवसा ठेवण्याच्या लायक नसतात.         विचारांच्या स्थैर्यासोबत कार्यातही स्थैर्य हवे. विचारांच्या स्थैर्य असेल तरच कृतीत स्थैर्य येते. विचार आणि कृती हे जीवनाचे दोन पंख आहेत. एखादे कार्य हातात घेतल्यानंतर त्याचे चांगले फळ मिळाले नाही तर माणूस कार्य सोडून देतो. कार्यावर मुलासारखे प्रेम असेल तरच माणूस कार्य सोडत नाही....

रक्षाबंधनाचे महत्त्व

Image
  रक्षाबंधन भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिण त्याच्या कपाळाला टिळा लावते. ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्वासाचे दर्शन आहे. बहिण जेव्हा भावाच्या मस्तकाला टिळा लावते त्यावेळी सामान्य भासणार्‍या ह्या क्रियेत दृष्टी परिवर्तनाची महान प्रक्रिया सामावलेली असते. सामान्य दृष्टीने जगाला पहात असलेल्या दोन डोळ्याशिवाय भोगाला विसरून भाव दृष्टीने जगाला पाहण्यासाठी जणू तिसरा एक पवित्र डोळा देऊन बहिणीने स्वतःच्या भावाला त्रिलोचन बनवलेले आहे. असा संकेत ह्या क्रियेत दिसतो. भगवान शंकराने तिसरा नेत्र उघडून कामाला भस्म करून टाकला होता. बहिण देखील भावाचा तिसरा नेत्र, बुद्धीचा डोळा उघडून त्याला विकार, वासना इत्यादींना भस्म करायला सुचवीत असते.       भावाच्या हातात रक्षा बंधून बहिण त्याच्यापासून केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असेच नाही तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छा करते. त्याच बरोबर बाह्य शत्रूवर व आंतरविकारावर स्वतःच्या भावाने विजय मिळवावा किंवा त्याच्यापासून सुरक्षित रहावे ही भावना देखील त्यात सामावलेली आ...

रक्षाबंधन - पवित्र नात्याचा सन

Image
र क्षाबंधन       रक्षाबंधन म्हणजे प्रेम बंधन. आजच्या दिवशी बहिण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याचबरोबर त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. भाऊ बहिणीचे मिलन म्हणजे पराक्रम व प्रेम तसेच सहास संयम यांचा सहयोग.      भोग किंवा स्वार्थ यांनी पछाडलेल्या जगाच्या सर्व सबंधांमध्ये नि:स्वार्थ व पवित्र असा भावा - बहिणीचा खरा प्रेम संबंध, हा जणू काय खाऱ्या समुद्रामध्ये सापडलेल्या एखाद्या गोड्या पाण्याच्या साठ्यासारखा आश्चर्यकारक आहे. भारतीय संस्कृती तसेच तिचे प्रवर्तक ऋषिमुनी यांनी या सबंधाची नि:स्पृहता व पवित्रता यांचे महिमा गान केलेले आहे. भारतीय संस्कृती म्हणजे मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती. स्त्रीला भोगदाशी न समजता तिचे पूजन करणारी संस्कृती!      भारतीय संस्कृतीने तर स्रीचे पूजन केले आहे. 'यत्र नार्येस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता:|' जेथे स्री चे पूजन होते, तिला मान दिला जातो, तेथे देव रमतात.' असे भगवान मनूचे वचन आहे. स्त्री - समाजाकडे भोगाच्या दृष्टीने न पाहता पवित्र दृष्टीने, मानाच्या भावनेने पाहण्याचा आदेश देणारी...

सागर पूजन - नारळी पौर्णिमेची तयारी.

सागर पूजन  सर्व नद्यांची सर्व शक्ती मिळाली तरी सागर बिघडत नाही, उन्मत्त बनत नाही, स्वतःच्या मर्यादाचे उल्लंघन करीत नाही. चार पैसे मिळतात उन्मत बनून कुळाची, समाजाची, राष्ट्राची, धर्माची किंवा संस्कृतीची मर्यादा जुगारून देण्यास उद्युक्त होणाऱ्या दंगेखोर मानवाला सागराची ही नम्रता आगळे जीवनदर्शन घडवते. जशी मित्राची परीक्षा आपत्तीत होते, वीराची परीक्षा रणांगणात होते तशी व्यापाऱ्याची परीक्षा संपत्तीमध्ये होते. वैभव वाढताच जो विश्वेश्वरापासून विमुख होत नाही, वैभव हे प्रभू प्रसाद आहे; असे जो समजतो तोच व्यापारी संपत्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. जनक असेच एक वैभवशाली विभूती होते.    खारा पण 'गोड' समुद्र चंद्राला पाहून वेडा होतो. समुद्र पूजन करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही विचार केला पाहिजे की, ज्याला पाहून वेडेपिसे व्हायला होते अशा संताला आपल्या जीवनात स्थान आहे की नाही? चंद्राला पाहून सागर जसा उचंबळून येतो तसा एखाद्या महापुरुषाचा मुख चंद्रमा पाहून आपल्या हृदय सागरालाही भरती आली पाहिजे. चंद्र ज्याच्याकडून प्रकाश घेतो त्या सूर्याला सागर स्वतःची संपत्ती देतो. सूर्यार्पण केल्याने त्याचा खार...

मत्स्यगंधा पूजन

सागर पूजन       हा उत्सव सहासिक व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा उत्सव गणला जातो. समुद्रावर सत्ता चालवणाऱ्या वरून देवाने, पूजेने प्रसन्न होऊन माल आणता - नेताना वाहनांना नुकसान पोहोचू नये असा भाव ह्या समुद्र पूजनामागे असू शकतो. लोहाणा ज्ञातीचे लोक दर्या लालला स्वतःचा देव मानतात आणि संपूर्ण वर्ष त्याचे पूजन करतात.      या उत्सवा द्वारे प्राचीन भारताच्या व्यापार - उद्योगाची स्मृती ताजी होते. त्या दिवशी इजिप्त, गिरीष, लंका, ब्रह्मदेश, चीन, जावा इत्यादी देशात जाऊन स्वतःच्या देशाची संपत्ती वाढवणारे व्यापारी पूर्वज तसेच कला- कौशल्य, तत्त्वज्ञान, धर्म, देवता इत्यादींचा प्रचार करणाऱ्या संस्कृती- वीरांची पुण्यशील व प्रेरणादायी स्मृती, सागरात नारळ फेकताना ताजी करायची असते.      'सागरे सर्व तीर्थानि'... नदीपेक्षा संगम व संगमा पेक्षा सागर अधिक पवित्र आहे, असे ऋषींनी सांगितले आहे. गीताकारांनी स्थितप्रज्ञाची तुलना सागरा बरोबर केली आहे. स्वतःमधील सर्व घाण -कचरा घेऊन नद्या सागराला मिळतात तरीही अचल समुद्र स्वतःच्या प्रतिष्ठेपासून चलीत होत नाही, तसा स्थितप्रज्ञ ...

श्रावणी पौर्णिमा - संत ऋषी -मुनींना स्मरण करून देणार सन

Image
बटूच्या हातातील दंड आत्मशासनाचे प्रतीक आहे. आत्मशासन हेच श्रेष्ठ शासन आहे. बाह्य शासन कितीही समर्थ असो मानवाला बदलायला ते असमर्थ ठरते. स्वतःच्या हातातून झालेल्या अपराधाचा दंड किंवा शिक्षा स्वतःच मागून घेणे हे आत्मशासनाचे रहस्य आहे. स्वतः पासून लपवून माणूस कोणताच गुन्हा किंवा पाप करू शकत नाही. शंख ऋषीच्या आश्रमातील एक आंबा अजानता तोडल्यामुळे स्वेच्छेने स्वतःचा हात कापून घेणाऱ्या महाभारतातील ऋषी लिखित ची कथा आपण सर्वांना माहित आहे. शिवाय दंड संरक्षणार्थ देखील उपयोगी आहे. जसा दंड सरळ व साधा असतो तसा दंड धारण करणाऱ्या बटोने देखील सरळ, साधे व कणखर राहायचे असते. वाटेल तेथे वाटेल त्याच्यापुढे नमायचे नसते. नमेन तर फक्त मातापित्या समोर, गुरु समोर, संतांसमोर व भगवंता समोर. माणसाने सर्व ठिकाणी नमून दिन किंवा लाचार बनता कामा नये. तसेच कोणालाही नमनार नाही असे उन्मतही होता कामा नये. नमायचे योग्य स्थान असेल तेथे दंडवत प्रणाम करण्याची माणसाची तयारी असली पाहिजे.      जानवे घेताना बटू ने मृगाजीन वापरायचे असते. ते कृतज्ञतेचे प्रतिक आहे. मानवाला मांसाअहारावरून वनस्पती अहारापर्यंत आणण्यासाठी ...

श्रावणी पौर्णिमा आणि उपनयन संस्कार

श्रावणी पौर्णिमा  ज्ञाननिष्ठ ब्राह्मणांचा यज्ञोपवित बदलण्याचा उत्सव, भक्ती प्रधान बंधू भगिनींचा रक्षाबंधनाचा उत्सव व कर्मवीर व्यापाऱ्यांचा समुद्र पूजनाचा उत्सव अशा तीन उत्सवांचा त्रिवेणी संगम म्हणजेच श्रावणी पौर्णिमा. उपनयन संस्कार  यज्ञोपवित धारण करायच्या संस्काराला संस्कारात उपनयन संस्कार असे नाव देण्यात आलेले आहे. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. ज्या संस्काराने विद्यार्थ्याला गुरु जवळ देण्यात येते तो संस्कार म्हणजे उपनयन संस्कार. यज्ञोपवित धारण करणाऱ्याने वेदनिष्ठा धारण करायची असते आणि वेदनिष्ठा घेतलेल्या शिष्यालाच गुरु ज्ञान देतो; त्यालाच गुरु दीक्षा देतो. दीक्षा म्हणजे जिस दिशा दाखवते, ती दृष्टी देतो. यज्ञापवीत धारण केल्यानंतर गुरु जवळ जाणाराला कर्तव्याची दिशा व जीवनाची दृष्टी प्राप्त होते. या दृष्टीने उपनयनाचा अर्थ दुसरा डोळा, नवीन दृष्टी असाही होऊ शकतो.      उपनयन संस्कार हा दिव्य संस्कार आहे. त्याच्याद्वारे मानवाला नवा जन्म मिळतो. तो त्याचा दुसरा जन्म आहे. जन्मना जायते शूद्रा: 'संस्कारात् द्विज उच्चते|' उपनयन संस्कार म्हणजे तेजस्वी जीवनाची दीक्षा...

ध्येयपूजा - कलियुगाची गरज.

Image
ध्येयपूजा    आपल्या देशात लोकांनी ध्येयपूजा केली आहे. जीवनात काही ध्येय बाळगून जगले आहेत. ज्यांना ध्येयाची कल्पनाच नाही ते लोक असा युक्तिवाद करतात की विसाव्या शतकात असे मोठे ध्येय बाळगून जीवनात यशस्वी होता येत नाही. परंतु आपण यशस्वी होण्याचा विचारच कशासाठी करायचा? तुम्ही एकदा मनापासून प्रेम तर करा, मग भले ते अयशस्वी ठरो. पण ज्याने चित्तएकाग्रतेसाठी प्राथमिक गोष्टी जीवनात खरे प्रेमच केले नाही त्याला प्रेम करण्याचा जो आनंद आहे तो कसा कळणार? जीवनात यशस्वी होऊ किंवा अयशस्वी होऊ त्याची तमा न बाळगता जीवनात ध्येय बाळगा.  ध्येयाला यशस्वी करायचं की नाही ते भगवंतावर सोडून द्या. अवघाची संसार सुखाचा करीन असे म्हणणारे कित्येक भागवत भक्त होऊन गेलेत. त्याच्यातील एकाचे तरी ते स्वप्न खरोखर साकार झाले आहे? म्हणजे त्याचा अर्थ असा नव्हे की ते ध्येय निरर्थक होते. ध्येयनिष्ठ जीवन जगणे हे दैवी जीवन आहे. रात्रंदिवस माणसाला या ध्येयाची स्वप्न पडली पाहिजेत. 'मला हे करायचं आहे' हा जीवनाचा निर्धार असला पाहिजे. 'होईल तर पाहू... किंवा 'जमले तर करू' असे बोलणाऱ्याचे जीवन आळणी आहे.   ...

जीवन हे ध्येयवादी पाहिजे असा श्रुतीचा आदेश.

Image
श्रुतीचा आदेश प्रभो! आयुष्यात कोणालाही ध्येयहीन जीवन देऊ नकोस. सकाळी उठला, क्लब मध्ये गेला, तिथून येऊन चहा प्यायला, चार मित्रमंडळी सोबत चिवडा खाल्ला, ऑफिसला गेला, ऑफिसमधून आल्यावर कुठल्यातरी पार्टीला गेला किंवा सिनेमा, नाटक बघायला गेला, रात्री बारा वाजता घरी येऊन झोपी गेला. हेच काय जीवन आहे? अशा आळणी जीवनाला काहीच अर्थ नाही.        मला काही करायचं आहे अशी भावना असली पाहिजे, जीवनात ध्येय असले पाहिजे आणि असे ध्येय की जे मांगल्याकडे घेऊन जाईल. जीवनाला सत्यं शिवं सुंदरम् बनवेल असे ध्येय जीवनात बाळग. म्हणून ध्येयपूजा, देवपूजा जीवनात बाळगण्याचा श्रुतीचा आदेश आहे.   

वेदधर्माचा उपदेश अमलात आणला पाहिजे.

 वेदधर्माचा उपदेश वेदाध्ययन पूर्ण करून घेतल्यावर आचार्य शिष्याला पुढील प्रमाणे वेदधर्माचा उपदेश करत आहेत. सत्य बोल, धर्माचे आचरण कर, स्वाध्याय -वेदाध्ययन करण्यात कधी प्रमाद करू नकोस. आचार्यांना अभिष्ट गुरुदक्षिणा दिल्यानंतर, प्रजासूत्राला- संतान परंपरेला छेद देऊ नकोस अर्थात् ब्रह्मचारी आश्रमात राहिल्या नंतर गृहस्थाश्रम पाळण्यास प्रवृत्त हो. सत्याचा कधीही त्याग करू नकोस. धर्माचा कधी त्याग करू नकोस. कुशल कर्मात- कामात करू नकोस. ऐश्वर्यादायी, मांगलीक   कर्मात परमाद करू नकोस. स्वाध्याय- प्रवचन अर्थात् स्वतःचा अभ्यास तसेच दुसऱ्यांना उपदेश करण्यात कधी प्रमाद करू नकोस. देव कार्य तसेच पितृ कार्य यांचा कधी त्याग करू नकोस. आईला देव मानून तिची उपासना कर. पित्याला देव समजून त्यांची उपासना कर. आचार्यांना देव समजून त्यांची उपासना कर. अतिथीची देव समजून उपासना कर. जी जी कार्मे निंदारहीत आहेत तीच तू कर. इतर कर्मे कधी करू नकोस. आमचे सूचरीत- श्रेष्ठ आचरणच तू अनुसरावे अन्य नाही. जे ब्राह्मण आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असतील त्यांना अविलंब बसायला असन द्यावे. तू जे काही देशील ते श्रद्धेने दे. अश...

शितला सप्तमी

Image
शितला सप्तमी      श्रावण महिन्याच्या शुद्ध सप्तमींला शीतला सप्तमी म्हणतात. तिच्या अगोदरच्या षष्ठीला स्वयंपाक षष्ठी म्हणतात. स्वयंपाक षष्ठीच्या दिवशी सर्व शिजवून घेतल्यावर स्रीया शेगडी आदी सर्व भोजन बनवण्याच्या साधनांची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी शिळे, थंड जेवण जेवतात.      हा उत्सव साधन पूजेचा महिमा समजावतो. ज्या साधनाद्वारे आपण आपली कार्य करतो ती साधने जड असूनही आपल्या उपयोगी पडतात. म्हणून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ बुद्धी ठेवली पाहिजे. तात्विक दृष्टीने पाहता जगात काही जड नाहीच. आणि म्हणून आपल्या कामात सहाय्य बनणाऱ्या निमित्तरूप साधनात असलेल्या सुप्त चैतन्याची आपण पूजा केली पाहिजे.      शितला सप्तमीच्या दिवशी स्त्रिया शेगडीची पूजा करतात. चूल ही स्वयंपाक घरातील देवता आहे. कृतज्ञतेच्या पायावर उभी असलेली भारतीय संस्कृती या ग्रहदेवतेचे उपकार कसे विसरेल? स्वतः तापून जे रोज आहार शिजून देते त्यात चुलीचे पूजन करून स्रीया चुली बद्दलची स्वतःची कृतज्ञता प्रदर्शित करतात. एवढेच नाही तर सतत तापलेले राहणाऱ्या ह्या चुलीत त...

शितला सप्तमी

Image
लेखणी असो, तलवार असो, नांगर असो वा तराजू, शेगडी असो, वा झाडू असो प्रत्येक वस्तूला पवित्र मानण्यातच तिचे पूजन पूर्ण होत नाही; तर प्रत्येक वस्तूची पवित्रता टिकून धरण्यात ते उत्कृष्ट ठेवण्यातच तिच्या पूजेची पूर्णहूती होते. जे कर्म वाट्याला आले ते कर्म उत्कृष्ट रीतीने करणे हे कर्माचे पूजन आहे. तशी मिळालेली वस्तू उत्कृष्ट राखणे हे त्या वस्तूचे पूजन आहे. आपल्या वस्रांना आपण स्वच्छ व पवित्र ठेवतो ही आपल्या वास्रांची पूजा आहे.      दात स्वच्छ व सफेद ठेवणे, शरीर स्नानादि करून स्वच्छ ठेवणे, केस विंचारणे वगैरे सर्व त्यांच्या पूजा आहेत. सणासुदीच्या दिवशी स्वतःच्या वाहनांना हार घालणारा माणूसही त्याची पूजाच करतो. त्याचप्रमाणे सोपविलेले काम उत्तम रीतीने करणे ही त्या कामाची पूजा आहे. उत्कृष्ट अभ्यास करणे, आई-वडिलांच्या अज्ञाचे पालन करणे, गुरूची सेवा करणे इत्यादी सर्व कर्म पूजाच आहे.      साधन पूजा व कर्म पूजा यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने जो समजून घेतो. त्याच्यावर शीतला माता प्रसन्न होते. तोच जीवनात शीतलता अनुभवू शकतो. शितला माता सेवेची देवता आहे. सेवा करणारा जेव...

नागपंचमी - भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण.

Image
नागपंचमी   भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमानं पाहायचं शिकवते. आपल्या संस्कृतीने पशुपक्षी, वृक्ष वनस्पती, सर्वांशी आत्मीय संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या येथे गाईची पूजा होते. कित्येक भगिनी कोकीळा वृत्त करतात. कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचं असे हे व्रत आहे. आपल्या येथे पोळा म्हणजे वृषभोत्सवाच्या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते. वटसावित्री सारख्या वृत्तामध्ये वडाची पूजा केली जाते. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीच्या वैशिष्ट्याची पराकाष्टा झालेली दिसून येते.      गाय, बैल, कोकिळा इत्यादीचे पूजन करून आत्मीयता साधण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण ते उपयोगी आहेत. पण नाग आपल्या उपयोगी पडतो का? उलट एखाद्याला तो चावला तर त्याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. आपण सर्व त्याला घाबरत असतो. नागाच्या या भीतीमुळे नाग पूजा सुरू झाली असेल असे काही लोक मानतात. पण ही मान्यता आपल्या संस्कृतीशी सुसंगत वाटत नाही.      आयपीएल नागाला देव म्हणून स्वीकारण्यात आ...

ऋषी यांसारखे महापुरुष देवा समान आहेत.

तर्पण          आपल्या सारखी सामान्य माणसे तर आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी जगात जन्म घेतात. लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात, तेव्हा आईला त्यांच्याबरोबर हा खेळ खेळण्यात कोणता आनंद मिळणार असतो? जे जीवनात खरा भात शिजवून सगळ्यांना जेवून घालते तिला खेळातला खोटा खोटा भात शिजवण्यात कोणता आनंद मिळत असेल ते सांगणे कठीण आहे. तसेच त्या लोकांचे आहे. जीवनात ज्यांनी परमोच्च आनंद अनुभवला आहे ते लोक संसारात कशा करता येत असतील?         घटकाभर असे मानू की जग सुधारण्यासाठी भगवंताने त्या लोकांना पाठवले असेल. तर मग प्रश्न उभा ठाकतो की भगवंताला जग बदलायचे असेल तर तो वर बसून जग बदलू शकत नाही का? पण थोडा खोलवर विचार केला तर अशीही शक्यता वाटते की त्यांच्या इथे येण्याने भगवंताला आनंद वाटत असेल आणि भगवंतापासून अलग होऊन भगवंताला हाक मारण्यात या लोकांना भक्तीचा आनंद मिळत असेल. असे शक्य आहे की भगवंताची व त्यांची खाजगी गणती देखील होत असेल पण त्यांची नावे जाहीर होत नसतील. इतर सर्वांचे होतात पण त्यांच्या खात्याचे ऑडिट कोण करणार?        खरे विचाराल तर अंतर...

क्षेत्रपाळ - कृषिप्रधान देशात सर्प महत्त्व.

Image
क्षेत्रपाळ   आपला देश शेतीप्रधान होता आणि आहे. साप हा आपल्या शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला क्षेत्रफळ देखील म्हणतात. जीव, जंतू, उंदीर इत्यादी पिकांचे नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यांचा नाश करून तो आपल्या पिकाला हिरवेगार ठेवतो. हा काय त्याचा लहानसा उपकार आहे? साप आपल्याला कित्येक मूक संदेशही देतो. सापाचे गुण पाहण्यासाठी आपल्याकडे गुणग्राही व शुभग्रही दृष्टी असली पाहिजे. भगवान दत्तात्रयाची अशी शुभदृष्टि होती म्हणूनच त्यांनी प्रत्येक वस्तू कडून काही ना काही गुण घेतले आहे.      साप उगाचच कोणाला चावत नाही. त्याला हैरण करणाऱ्याला केव्हा याची छेड काढणाराला तो दंश करतो. त्याला देखील प्रभुने निर्माण केले आहे. हा जर नुकसान केल्याशिवाय सरळपणे जात असेल किंवा निरूपद्रवी रूपात जगत असेल तर त्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जेव्हा आपण त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी, स्वतःच जीवन टिकविण्यासाठी तो दंश करीत असेल तर त्याला दुष्ट का म्हणून ठरवायचं? आपला प्राण घ्यायला येणाऱ्याचा प्राण घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही का?   ...

अतिथी - ज्याच्या जीवनात श्रेष्ठत्व आहे तो अतिथी

Image
  अतिथी     अतिथी म्हणजे जो दुसऱ्या दिवशी राहत नाही; दुसरी तिथी पाहत नाही. याचा अर्थ जो आजच्या पुरताच आला आहे तो अतिथी, त्याला देव समज. पण याचा अर्थ असा नव्हे की जो भीक मागायला आला असेल किंवा पैसे मागायला आला असेल त्याला देव समजून त्याची पूजा कर.          जगात जन्म घेऊन ज्याने काही विशेष केले आहे, अर्थात ज्याच्या जीवनात श्रेष्ठत्व आहे त्याला अतिथी म्हणतात. आपल्या घरी येणाऱ्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करण्याकरता लांब केलेले पाय खेचून घेतो किंवा बसलेले असू तर उभे राहतो, अशी जी व्यक्ती असेल तिला अतिथी माना. तिला देव समजा. आपल्याकडे येणारे सर्व लोक स्वर्थीपोटीच येतात असे देखील नाही. कित्येक लोक रिकामटेकडे असतात ते स्वार्थापोटी भले येत नसतील पण गप्पा मारायला येतात त्यांना अतिथी मानले जात नाही.          पण जगात असेही कित्येक अतिथी आहेत की जे आल्यानंतर जगत् श्रेष्ठ झाले. त्या सर्वांना नमस्कार केला पाहिजे. वशिष्ठ, विश्वमित्र, याज्ञवल्क्य, पतंजली, वाल्मिकी या सगळ्यांना जगाकडून काय घ्यायचे होते? त्यांचे समग्र जिवन तपासल...

ज्ञान आणि विज्ञान यांतील फरक.

Image
विज्ञान- अनुभूती ज्ञानाने समज निर्माण होते आणि विज्ञानाने अनुभूती येते, त्यामुळे तृप्ती येते. येथे पदार्थ विज्ञानाला उद्देशून विज्ञान शब्द वापरलेला नाही. प्रयोग शाळेत अनुभवाला येथे ते विज्ञान नाही त्या विज्ञानाचे प्रयोग दुसऱ्याच्या शरीरावर होऊ शकतात, माकडांवर, उंदरांवर वैज्ञानिक लोक प्रयोग करतात. परंतु अध्यात्मातले प्रयोग स्वतःच्या शरीरावरच होतात. दुसऱ्याच्या शरीरावर अहं ब्रह्मास्मि चा प्रयोग होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे जाणीव, समज व विज्ञान म्हणजे प्रयोगाद्वारे स्वतःच्या जीवनात त्याचे अनुभूती घेणे. या दोहोंमुळे ज्याचा आत्मा तृप्त झाला आहे, ज्याला हा तृप्तीचा ढेकर आला आहे, त्याला तृप्तात्मा म्हणतात.        भगवान या जगात आहे, तो तुला सांभाळतो आहे, कारण तू त्याचा मुलगा आहेस. हे सगळे आपण प्रवचनातून ऐकतो. गीतेत आणि उपनिषदात वाचतो. समजून घेतो पण समजणे वेगळे आणि अनुभवणे वेगळे. कोणत्याही गोष्टीची समज प्रथम हवीच. सामान्य खाण्याच्या गोष्टी घ्या ना. त्या पदार्थाची समज घेतली पाहिजे पण तितके पुरेशी नाही. याची अनुभूती घेतली तर कळते की तो पदार्थ कसा होता. राज महालाची वाख...

ध्येय - जीवनातील महत्त्वाचा पैलू.

ध्येयाचे मीठ  जुन्या काळी कोणी म्हटले असेल, तू जे ध्येयहीन जीवन जगतो आहेस त्याला काही अर्थ नाही. प्रभूसाठी, काही ध्येयासाठी तू जीवण जग, नाहीतर तुझे जीवन आळणी आहे. महिन्यातून एखाद्यावेळी आळणी अन्न खाऊन बघ म्हणजे तुला समजेल की आळणी जीवन असे असते, म्हणजे तर त्याने तुझी बुद्धी बदलेल. पण त्याचा अर्थ लोकांनी कसा केला श्रावण महिन्यात मीठ खायचे बंद करायचे! ध्येयरुपी मीठ तुझ्याजवळ नसेल तर तुझा बंगला, मोटार, वैभव सगळे निरर्थक आहे. जीवनाच्या पेज मध्ये ध्येयाची मीठ असायला हवे. हे जीवनाचे वैभव आहे.

भारतीय लोकांत ध्येयपूजा असली पाहिजे.

ध्येयपूजा   आपल्या देशात लोकांनी ध्येयपूजा केली आहे. जीवनात काही ध्येय बाळगून जगले आहेत. ज्यांना ध्येयाची कल्पनाच नाही ते लोक असा युक्तिवाद करतात की विसाव्या शतकात असे मोठे ध्येय बाळगून जीवनात यशस्वी होता येत नाही. परंतु आपण यशस्वी होण्याचा विचारच कशासाठी करायचा? तुम्ही एकदा मनापासून प्रेम तर करा, मग भले ते अयशस्वी ठरो. पण ज्याने जीवनात खरे प्रेमच केले नाही त्याला प्रेम करण्याचा जो आनंद आहे तो कसा कळणार? जीवनात यशस्वी होऊ किंवा अयशस्वी होऊ त्याची तमा न बाळगता जीवनात ध्येय बाळगा. ध्येयाला यशस्वी करायचं की नाही ते भगवंतावर सोडून द्या. अवघाची संसार सुखाचा करीन असे म्हणणारे कित्येक भागवत भक्त होऊन गेलेत. त्याच्यातील एकाचे तरी ते स्वप्न खरोखर साकार झाले आहे? म्हणजे त्याचा अर्थ असा नव्हे की ते ध्येय निरर्थक होते. ध्येयनिष्ठ जीवन जगणे हे दैवी जीवन आहे. रात्रंदिवस माणसाला या ध्येयाची स्वप्न पडली पाहिजेत. 'मला हे करायचं आहे' हा जीवनाचा निर्धार असला पाहिजे. 'होईल तर पाहू... किंवा 'जमले तर करू' असे बोलणाऱ्याचे जीवन आळणी आहे. 

ध्येयवादी असणे हा श्रुतीचा आदेश आहे.

Image
श्रुतीचा आदेश प्रभो! आयुष्यात कोणालाही ध्येयहीन जीवन देऊ नकोस. सकाळी उठला, क्लब मध्ये गेला, तिथून येऊन चहा प्यायला, चार मित्रमंडळी सोबत चिवडा खाल्ला, ऑफिसला गेला, ऑफिसमधून आल्यावर कुठल्यातरी पार्टीला गेला किंवा सिनेमा, नाटक बघायला गेला, रात्री बारा वाजता घरी येऊन झोपी गेला. हेच काय जीवन आहे? अशा आळणी जीवनाला काहीच अर्थ नाही.        मला काही करायचं आहे अशी भावना असली पाहिजे, जीवनात ध्येय असले पाहिजे आणि असे ध्येय की जे मांगल्याकडे घेऊन जाईल. जीवनाला सत्यं शिवं सुंदरम् बनवेल असे ध्येय जीवनात बाळग. म्हणून ध्येयपूजा, देवपूजा जीवनात बाळगण्याचा श्रुतीचा आदेश आहे.   

दैवी वैभव - मी कोणत्यातरी ध्येयचा आहे.

दैवी वैभव      जसा 'मी आहे' चा सुवास आध्यात्मिक वैभव आहे, 'मी प्रभूचा आहे' हे भक्तीचे वैभव आहे त्याचप्रमाणे 'मी कोणत्यातरी ध्येयाचा आहे' हे दैवी वैभव माणसाने जीवनात मिळवायचे आहे.        शक्य आहे की 'मी प्रभूचा आहे' या स्टेजपर्यंत माणूस पोहोचला नसेल किंवा 'मी आहे' पर्यंत माणसाची आध्यात्मिक झेप पोहोचली नसेल तर 'मी कोणत्यातरी ध्येयासाठी जीवन जगतो मला माझे जीवन दैवी बनवायचा आहे' असे ध्येय तरी जीवनात असले पाहिजे. एक संत म्हणतात ना-अवघाची संसार सुखाचा करीन  सगळ्या लोकांना सुखी करीन. सगळ्यांच्या ओठावर प्रभुनाम खेळेल असे पाहिन. सर्व लोकांच्या जीवनात भव्यता, दिव्यता आणिन, असे ध्येय जीवनात बाळगले पाहिजे. ज्यांच्या जीवनात काही ध्येय नाही, जे ध्येयरहित आहे ते जीवन आळणी आहे.