रक्षाबंधन - पवित्र नात्याचा सन
रक्षाबंधन
रक्षाबंधन म्हणजे प्रेम बंधन. आजच्या दिवशी बहिण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याचबरोबर त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. भाऊ बहिणीचे मिलन म्हणजे पराक्रम व प्रेम तसेच सहास संयम यांचा सहयोग.
भोग किंवा स्वार्थ यांनी पछाडलेल्या जगाच्या सर्व सबंधांमध्ये नि:स्वार्थ व पवित्र असा भावा - बहिणीचा खरा प्रेम संबंध, हा जणू काय खाऱ्या समुद्रामध्ये सापडलेल्या एखाद्या गोड्या पाण्याच्या साठ्यासारखा आश्चर्यकारक आहे. भारतीय संस्कृती तसेच तिचे प्रवर्तक ऋषिमुनी यांनी या सबंधाची नि:स्पृहता व पवित्रता यांचे महिमा गान केलेले आहे. भारतीय संस्कृती म्हणजे मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती. स्त्रीला भोगदाशी न समजता तिचे पूजन करणारी संस्कृती!
भारतीय संस्कृतीने तर स्रीचे पूजन केले आहे. 'यत्र नार्येस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता:|' जेथे स्री चे पूजन होते, तिला मान दिला जातो, तेथे देव रमतात.' असे भगवान मनूचे वचन आहे. स्त्री - समाजाकडे भोगाच्या दृष्टीने न पाहता पवित्र दृष्टीने, मानाच्या भावनेने पाहण्याचा आदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
रक्षा-बंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते. राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत दृष्टीने पाहत नाही एवढेच नाही तर तिच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वतःवर घेतो, त्यामुळे बहिण समाजात निर्भय बनून फिरू शकते. आज बहिण निर्भय नाही. समाजात निर्भयपणे फिरू शकत नाही. तिची चेष्टा करून पशुतुल्य वृत्ती पोहोचणाऱ्या भावाला आज समजावून किंवा शिक्षण देऊन पाठ शिकविण्याची गरज आहे. ह्या लोकांना माहीत नाही की, ज्या समाजात बहिण निर्भय नाही तो समाज हळूहळू पौरुष्य गमावून अवदशा प्राप्त करतो.
Comments
Post a Comment