महान व्यक्तीमत्त्वासाठी भगवंताने ही अश्रू ढाळले.
ज्या ज्या लोकांनी भगवंताच्या हातात शक्ती देऊन हवन केल आहे ते हवन मोठ आहे. आपल्याला जीवनात झिजाव तर लागतच. माणूस बायका मुलांसाठी झिजूनच म्हातारा होतो ना! शक्ती वापरतात तर सर्वजण. पण जे स्वतःची शक्ती, संपत्ती भगवंताच्या हातात ठेवतात तेव्हा त्याला हवन केलं असं म्हणतात. 'संपत्ती स्वतःकमावलेली असेल तर ती कन्या होते, बापाने कमावलेली असेल तर भगिनी आणि दुसऱ्याकडून मिळालेली असली तर परस्री होते. तर ती भोगायची कशी? तेव्हा कोणत्याही प्रकारे बुद्धिमान माणसासाठी लक्ष्मी त्याज्य आहे.' हा काव्य विनोद आहे, शास्त्रीय सिद्धांत नाही, पण लोक हे विनोदातच घेतील याची खात्री आहे. स्वतःची सर्व शक्ती भगवंताच्या हाती देणे याला हवन म्हणतात. महाभारत युद्धात जेव्हा अभिमन्यू धारातीर्थी पडला तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. भाचा मेला म्हणून श्रीकृष्ण रडला असेल काय? नाही. अभिमन्यूने स्वतःच्या देहाचं विशिष्ट ध्येयासाठी हवन केलं म्हणून भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. अभिमन्यूच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती. समोरच्या पक्षाने चक्रविव्ह रचला आहे. तो भेदू शकेल असे पिताश्री अर्जुन, कृष्णासह दूर ...