क्षेत्रपाळ - कृषिप्रधान देशात सर्प महत्त्व.

क्षेत्रपाळ 

आपला देश शेतीप्रधान होता आणि आहे. साप हा आपल्या शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला क्षेत्रफळ देखील म्हणतात. जीव, जंतू, उंदीर इत्यादी पिकांचे नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यांचा नाश करून तो आपल्या पिकाला हिरवेगार ठेवतो. हा काय त्याचा लहानसा उपकार आहे? साप आपल्याला कित्येक मूक संदेशही देतो. सापाचे गुण पाहण्यासाठी आपल्याकडे गुणग्राही व शुभग्रही दृष्टी असली पाहिजे. भगवान दत्तात्रयाची अशी शुभदृष्टि होती म्हणूनच त्यांनी प्रत्येक वस्तू कडून काही ना काही गुण घेतले आहे.
    
साप उगाचच कोणाला चावत नाही. त्याला हैरण करणाऱ्याला केव्हा याची छेड काढणाराला तो दंश करतो. त्याला देखील प्रभुने निर्माण केले आहे. हा जर नुकसान केल्याशिवाय सरळपणे जात असेल किंवा निरूपद्रवी रूपात जगत असेल तर त्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. जेव्हा आपण त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी, स्वतःच जीवन टिकविण्यासाठी तो दंश करीत असेल तर त्याला दुष्ट का म्हणून ठरवायचं? आपला प्राण घ्यायला येणाऱ्याचा प्राण घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही का?
    
सापाला सुगंध फार आवडतो. चाफ्याच्या रोपट्यांना वेटोळे घालून तो बसतो किंवा चंदनवृक्षावर तो निवास करतो. केवड्याच्या बनातही तो फिरत असतो. त्याला सुगंध आवडतो. म्हणून भारतीय संस्कृतीला तो प्रिय आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनातून सदगुणांचा सुगंध निघत असतो. सुविचारांचा सुगंध दरवळत असतो. तो सुगंध आपल्याला प्रिय असला पाहिजे.
    
आपण मागे पाहिले की, कारणाशिवाय सर्प कोणाला दंश करीत नाही. वर्षानुवर्षे मेहनत करून प्राप्त केलेली शक्ती म्हणजे विष. ती शक्ती कोणालाही चावून तो फुकट घालवीत नाही. आपणही जीवनात काही तप करतो. त्याच्यामुळे आपल्याला शक्ती निर्माण होते. ही शक्ती एखाद्यावर रागवण्यात निर्बलाला हैराण करण्यात किंवा अशक्ताला दुःख देण्यात खर्च न करता त्या शक्तीने आपण विकास साधून दुसऱ्या असमर्थ्यांना समर्थ बनविण्यात खर्चावी अशी अपेक्षा असते.
    
कित्येक दैवी सापांच्या डोक्यावर मनी असतो. हा मनी अतिशय अमूल्य असतो. आपणही जीवनात अमूल्य गोष्टी डोक्यावर घेतो. समाजाच्या मुकुटमणी समान महापुरुषांचे स्थान आपल्या मस्तकावर असले पाहिजे. आपण प्रेमानं त्याची पालखी उचलतो. त्यांच्या विचारानुसार आपले जीवन घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व विद्यामध्ये मनीरूप जी अध्यात्म विद्या आहे तिच्यासाठी आपल्या जीवनात वेगळे आकर्षण असले पाहिजे. ज्या ज्ञानाने आत्मविकास साधत नाही त्या ज्ञानाला ज्ञान कसे म्हणायचे?
   
 साप बिळात राहतो व अधिक प्रमाणात एकांत अनुभवतो, म्हणून मुमुक्षाने जनसमूहा पासून दूर राहिले पाहिजे, यासाठी सापाचे उदाहरण देण्यात येते. देव-दानवानी केलेल्या समुद्रमंथनात साधन रूप बनून वासुकी नागाने प्रभू कार्यात निमित्त बनवून दुर्जना साठीही मार्ग खुला करून ठेवलेला आहे. दुर्जन माणूस देखील खऱ्या मार्गाला लागला तर तो संस्कृतिक कार्यात फार मोठा हिस्सा देऊ शकतो. शिवाय स्वतःची दुर्जनता सतत सलत असल्यामुळे या माणसाने स्वतः केलेल्या कार्याबद्दल फारसा गर्वही वाटत नाही.
 
दुर्जन देखील भगवत कार्यात जोडला गेला तर प्रभू देखील त्याचा स्वीकार करतो. या गोष्टीचे समर्थन शंकराने सापाला गळ्यात बाळगून व विष्णूने शेषावर शयन करून केलेले आहे.समग्र सृष्टीच्या हितासाठी बरसणाऱ्या पावसामुळे निर्वाशीत बनलेला साप जेव्हा आपल्या घरात अतिथी बनून येतो तेव्हा त्याला आसरा देऊन कृतज्ञ बुद्धीने त्याचे पूजन करणे हेच आपले कर्तव्य ठरते. ह्या दृष्टीने नागपंचमीचा उत्सव श्रावण महिन्यातच आयोजित करण्यात आपल्या ऋषींनी फारच औचित्य दाखविलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन