नागपंचमी - भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण.
नागपंचमी
भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमानं पाहायचं शिकवते. आपल्या संस्कृतीने पशुपक्षी, वृक्ष वनस्पती, सर्वांशी आत्मीय संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या येथे गाईची पूजा होते. कित्येक भगिनी कोकीळा वृत्त करतात. कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचं असे हे व्रत आहे. आपल्या येथे पोळा म्हणजे वृषभोत्सवाच्या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते. वटसावित्री सारख्या वृत्तामध्ये वडाची पूजा केली जाते. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीच्या वैशिष्ट्याची पराकाष्टा झालेली दिसून येते.
गाय, बैल, कोकिळा इत्यादीचे पूजन करून आत्मीयता साधण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण ते उपयोगी आहेत. पण नाग आपल्या उपयोगी पडतो का? उलट एखाद्याला तो चावला तर त्याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. आपण सर्व त्याला घाबरत असतो. नागाच्या या भीतीमुळे नाग पूजा सुरू झाली असेल असे काही लोक मानतात. पण ही मान्यता आपल्या संस्कृतीशी सुसंगत वाटत नाही.
आयपीएल नागाला देव म्हणून स्वीकारण्यात आर्याच्या हृदयाच्या विशालतेचे दर्शन आपल्याला होते. 'कृणवंत विश्वं आर्यम्' ह्या गरजेने बरोबर पुढे पुढे जात असलेल्या आर्यांचा विभिन्न उपासना करीत असलेल्या अनेक माणूस समूहाशी संपर्क साधला गेला. वेदांचे प्रभावी विचार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्यांना अपार परिश्रम करावे लागले. विभिन्न समूहाच्या उपासना विधीमध्ये असलेल्या तफावतीमुळे निर्माण झालेला डंख जर काढून टाकण्यात आला तर सर्व मानव वेदांचे तेजस्वी आणि भव्य विचार स्वीकारतील अशी आर्यांची अखंड श्रद्धा होती. ही गोष्ट सहज शक्य बनवण्यासाठी वेगवेगळ्या देवांची पूजा स्वीकार्य मानली आणि ह्या रीतीने अनंत मानव समूहांना आत्मसात करून स्वतःमध्ये सामावून घेतले, या विभिन्न पूजा स्वीकारताना आपणाला नागपूजा सापडली असावी असे वाटते.
Comments
Post a Comment