श्रावणी पौर्णिमा - संत ऋषी -मुनींना स्मरण करून देणार सन



बटूच्या हातातील दंड आत्मशासनाचे प्रतीक आहे. आत्मशासन हेच श्रेष्ठ शासन आहे. बाह्य शासन कितीही समर्थ असो मानवाला बदलायला ते असमर्थ ठरते. स्वतःच्या हातातून झालेल्या अपराधाचा दंड किंवा शिक्षा स्वतःच मागून घेणे हे आत्मशासनाचे रहस्य आहे. स्वतः पासून लपवून माणूस कोणताच गुन्हा किंवा पाप करू शकत नाही. शंख ऋषीच्या आश्रमातील एक आंबा अजानता तोडल्यामुळे स्वेच्छेने स्वतःचा हात कापून घेणाऱ्या महाभारतातील ऋषी लिखित ची कथा आपण सर्वांना माहित आहे. शिवाय दंड संरक्षणार्थ देखील उपयोगी आहे. जसा दंड सरळ व साधा असतो तसा दंड धारण करणाऱ्या बटोने देखील सरळ, साधे व कणखर राहायचे असते. वाटेल तेथे वाटेल त्याच्यापुढे नमायचे नसते. नमेन तर फक्त मातापित्या समोर, गुरु समोर, संतांसमोर व भगवंता समोर. माणसाने सर्व ठिकाणी नमून दिन किंवा लाचार बनता कामा नये. तसेच कोणालाही नमनार नाही असे उन्मतही होता कामा नये. नमायचे योग्य स्थान असेल तेथे दंडवत प्रणाम करण्याची माणसाची तयारी असली पाहिजे.
    
जानवे घेताना बटू ने मृगाजीन वापरायचे असते. ते कृतज्ञतेचे प्रतिक आहे. मानवाला मांसाअहारावरून वनस्पती अहारापर्यंत आणण्यासाठी ऋषींनी वर्षानुवर्षे अमाप परिश्रम केलेले आहेत. त्यांनी मानवाला शेतीची कला शिकवली. अन्न निर्माण करणारा बनवले. पण हरणाच्या धावपळीमुळे पिकाचे नुकसान होऊ लागले. पीक नष्ट झाले तर माणूस पुन्हा मांस खाऊ लागेल. म्हणून मानवाचा उत्कर्ष ध्यानात घेऊन निर्दोष हरणांना मारायचं नक्की केलं. आणि त्यानुसार मृगया हा राजधर्म बनला. परंतु मानवाच्या विकासासाठी हरणाचे बलिदान घेतले जाते ही गोष्ट ध्यानात धरून कृतज्ञ बुद्धीने ऋषींनी मुर्ग चर्म पवित्र मानले. देवस्थान किंवा पूजा यांच्यामध्ये चामडे चालत नाही पण मुर्ग चर्माला तेथे बाधा येत नाही.
     
जानवे हे वैदिक जीवन धारणेचे प्रतीक आहे. जानव्यामध्ये नऊ तंतू असतात. आणि प्रत्येक तंतूवर वेगवेगळ्या नऊ देवतांची प्रस्थापना केलेली असते.
    
ॐकार प्रथम तंन्तौन्यासामि| अग्नि द्वितीय तंन्तौन्यासामि| नागान् तृतीय तंन्तौन्यासामि| सोमं चतुर्थ तंन्तौन्यासामि| पितृन् पंचमतंन्तौन्यासामि| प्रजापती षष्टम तंन्तौन्यासामि| वायू सप्तमंतन्यासामि| यामं अष्टमतंतून्यासामि| विश्वान् तंन्तौन्यासामि| देवान् नवमतंन्तौन्यासामि|   

      पहिल्या तंतूवर ॐकार, दुसऱ्या तंतूवर अग्नी,                तिसऱ्या तंतूवर नाग, चौथ्या तंतूवर सोम,
      नंतर अनुक्रमाने इतर प्रजापती, वायू, यम आणि            नवव्या तंतूवर विश्व देवता. 
ह्या रीतीने ह्या देवांना आवाहन करून त्यांची प्रस्तावना केलेली असते. जानवे नेहमी या देवतांचे आठवण देते. शरीरात देवता वास्तव्य करून आहेत. त्या माझ्या जीवनावर अंकुश ठेवतात. भगवान माझ्यासोबत आहे या गोष्टीचे सतत स्मरण मानव जीवनावर अंकुश ठेवते. व्दिजानी शरीरावर जाणवे कायमचे धारण केलेले असते. त्यांच्या प्रत्येक कर्माला ते साक्षी असते. त्यांच्या कर्तव्याचे व संकल्पनांचे ते स्मारक आहे व प्रभूच्या सतत सानिध्याचे ते प्रतीक आहे. 
   
जानवे आपल्याला सांगते जगाचा बादशहा सतत तुझ्याबरोबर आहे. तू त्याला पाहू शकत नाहीस पण तो तुला आणि तुझ्या कार्याला सतत पहात असतो. एवढे ध्यानात ठेवून चाललास तर तुझे सारे जीवन बदलून जाईल. भगवान आपल्या बरोबर आहे यात एक मोठे आश्वासनही साठवलेले आहे. जीवण संग्रामात आपण एकटे नाहीत. भगवान आपल्याबरोबर आहे. त्यामुळे जानवे धारण केलेला माणूस कधी हिम्मत हरत नाही‌.
    
जाणव्याच्या नऊ तंतूंना तीन-तीन मध्ये गुंफून त्रिसूत्री बनवण्यात येते. आणि या सूत्रावर अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांची स्थापना करण्यात येते. त्यानंतर ह्या तिघांची गाठ मारण्यात येते त्याला ब्रह्मगाट म्हणतात‌. तेथे अथर्ववेदाची स्थापना करण्यात येते. 
ऋग्वेद प्रथम दोरके न्यसामि| यजुर्वेद द्वितीय दोरके न्यसामि| सामवेद तृतीय दोरके न्यसामी| अथर्व वेद ग्रंथौ न्यसामि||
    
जीवनामध्ये देवता सतत ज्याच्या सानिध्यात असतात, वेद ज्यांना मार्गदर्शन करीत असतात त्यांना शेवटी ब्रह्माचे दर्शन - ब्रह्माची अनुभूती येते. जीवनाचे परम लक्ष्यच ब्रह्म आहे. ही त्रिसूत्री ज्ञान, भक्ती व कर्म यांचे प्रतीक आहे. ज्याच्या जीवनात ही तिन्ही विणली गेले त्याला ब्रह्माची अनुभूती होणारच. जाणवे म्हणजे तेजस्वी बुद्धीची दीक्षा. जाणवे म्हणजे बुद्धीचे प्रज्ञा परिवर्तन करणारे रसायन. 
ॐ भूर्भुव: स्व: ॐ तत्सवितूर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि| धियो यो न: प्रचोदयात्||   

'प्रेरणा देणाऱ्या, उत्पन्न करणाऱ्या परमात्मा देवतेचे स्वीकारण्यास योग्य, शुद्ध तेज आम्ही धारण करतो; ते आमची बुद्धी, कर्म वगैरेंना नेहमी सन्मार्गाकडे प्रवृर्त करीत राहो.' बुद्धीला तेजस्वी करणारे गायत्री मंत्राची दीक्षा जाण्याव्या सोबतच देण्यात येते. श्रावण प्रोपोर्णिमेला जाणवे बदलायचे असते. काही लोक श्रावण शुद्ध पंचमीला ही जाणवे बदलतात. जानवे बदलताना विश्व नियंत्या यमाला प्रार्थना करायची की, 'भगवान! मी वैदिक विचारानुसार जगेन व त्यानुसार भगवंताचे कार्य करीन. अजून कितीतरी सत्कृष्ट्या करायची बाकी आहेत. तू दिलेले आयुष्य कमी पडते. अजून एक वर्षाचे आयुष्य दे.'
     
जीवनाच्या आरंभीच्या काळात ज्यांना संस्कार व सुविचार यांचे खत मिळाले आहे आणि वेद निष्ठेचा ज्यांनी जीवनात स्वीकार केलेला आहे असे द्विज आज स्वतःच्या वेद रक्षणाच्या प्रतिज्ञाचा पुनरुचार करतात. आजच्या दिवशी ज्या ऋषी मुनीनी संस्कृतीच्या वृक्षाचे बीजरोपण केले, ज्या संतांनी याचे पोषण करून सांस्कृतिक अस्मिता जिवंत राखली व ज्या महापुरुषांनी या वृक्षाच्या फुलांचा श्वास व फळांचा गोडवा घराघरात जावो यासाठी जीवापाड प्रयत्न केले. त्या सर्व परोपकारी पुण्यशील आत्म्यांचे स्मरण करायचे, तर्पण करायचे. ज्या भूमीत जन्मले, नाचले व पवित्र कामे केली. त्या भूमीची माती कृतज्ञ बुद्धीने मस्तकावर धारण करायची. 'मृत्तिके हान्मे पापं...' हे माती! तू माझे पाप धुवून टाक. माझी दुष्कृत्य धुवून टाक.
    
संतांच्या ऋणांचे स्मरण करून देणारा हा उत्सव किती तेजस्वी आणि दिव्य आहे! त्यांचे स्मरण करताना त्यांनी दिलेली सांस्कृतिक मशाल सतत तेवती ठेवण्याची आज प्रतिज्ञा करायची. त्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत. त्याची पवित्र कर्मे व त्यांच्या विचारधारेच्या आधारे तर आपण टिकून राहिलो आहोत. त्यांचे आपल्यावर ऋण आहे. त्यांचेच विचार व संस्कृती टिकवून त्यांचा विस्तार व विकास आपण करू. तरच त्यांचे ऋण फेडले असे म्हणता येईल.
    
 प्राचीन काळी यज्ञोपवित बदलण्यासाठी द्विज तपोवनत जात असत. त्यामुळे तपोवना बरोबरचा त्यांचा संबंध कायम राहत असे. आणि तपोवनाची प्रगती, व्यवस्था इत्यादीची त्यांना कल्पना मिळत असे. सारांश जानवे घेणे म्हणजे जीवनाचे परम लक्ष नक्की करणे. जानवे घेणे म्हणजे जीवनात नियंत्रण मान्य करणे. देवापासून प्रेरणा व हिमतीचे समाधान घेऊन तेजस्वी जीवन जगणे. जाणवे म्हणजे तेजस्वी उपासना. जानवे म्हणजे वैदिक जीवनाची दीक्षा. जानवे म्हणजे ऋषी ऋणांची कल्पना. स्वकर्तुत्वाचे भान व हरीच्या उपस्थितीची अनुभूती. ध्येयविरहित जीवन म्हणजे पत्त्याशिवाय लिहिलेले पत्र. आजच्या तरुणांना यज्ञोपवित घेणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे. प्रभू श्रद्धा दृढ करणे. सांस्कृतिक श्रद्धा तेजस्वी ठेवणे. हे सर्व समजावण्याची गरज आहे. ज्या द्विज्यांनी हे ज्ञान प्राप्त केले आहे ते अशा तरुणांना हे महत्त्व समजावतील तरच ह्या क्रिये मागील मंत्र पुनर्जीवित होईल आणि तरच ह्या उत्सवाची सार्थकता झाली असे म्हणता येईल.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन