ज्ञान आणि विज्ञान यांतील फरक.

विज्ञान- अनुभूती
ज्ञानाने समज निर्माण होते आणि विज्ञानाने अनुभूती येते, त्यामुळे तृप्ती येते. येथे पदार्थ विज्ञानाला उद्देशून विज्ञान शब्द वापरलेला नाही. प्रयोग शाळेत अनुभवाला येथे ते विज्ञान नाही त्या विज्ञानाचे प्रयोग दुसऱ्याच्या शरीरावर होऊ शकतात, माकडांवर, उंदरांवर वैज्ञानिक लोक प्रयोग करतात. परंतु अध्यात्मातले प्रयोग स्वतःच्या शरीरावरच होतात. दुसऱ्याच्या शरीरावर अहं ब्रह्मास्मि चा प्रयोग होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे जाणीव, समज व विज्ञान म्हणजे प्रयोगाद्वारे स्वतःच्या जीवनात त्याचे अनुभूती घेणे. या दोहोंमुळे ज्याचा आत्मा तृप्त झाला आहे, ज्याला हा तृप्तीचा ढेकर आला आहे, त्याला तृप्तात्मा म्हणतात.
      
भगवान या जगात आहे, तो तुला सांभाळतो आहे, कारण तू त्याचा मुलगा आहेस. हे सगळे आपण प्रवचनातून ऐकतो. गीतेत आणि उपनिषदात वाचतो. समजून घेतो पण समजणे वेगळे आणि अनुभवणे वेगळे. कोणत्याही गोष्टीची समज प्रथम हवीच. सामान्य खाण्याच्या गोष्टी घ्या ना. त्या पदार्थाची समज घेतली पाहिजे पण तितके पुरेशी नाही. याची अनुभूती घेतली तर कळते की तो पदार्थ कसा होता. राज महालाची वाखणणी ऐकून राजाला संतोष होत नाही आणि भोजनाचे वर्णन वाचून भूक शांत होत नाही. त्याचप्रमाणे भक्ती केवळ ज्ञानाने साधत नाही. भक्ती अमलात आणली पाहिजे, आपल्या वागण्यातून ती दिसली पाहिजे जाणवली पाहिजे.


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन