चित्त एकाग्र कसे करावे आणि त्यांचे फायदे.
एकाग्रचित्त
ज्याला चित्त एकाग्र करायचा आहे त्याने स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे पाहत राहिले पाहिजे. म्हणजे ज्याला चित्त एकाग्र करायचा आहे त्यांनी स्वतःच्या नाकाला खूप सांभाळले पाहिजे. इहलोकातही व परलोकातही माणसाला नाक सांभाळता आले पाहिजे. नाक कापले न जावे याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या हातून काही उलट सुलट घडले तर दुसऱ्या माणसाला तोंड दाखवण्याची देखील आपल्याला शरम वाटते. मग कापले गेलेले नाक घेऊन भगवंताला तोंड दाखवताना किती लाज वाटली पाहिजे? हे तर शाळेत त्रैराशीक आहे. चित्त एकाग्र करायला बसल्यानंतर भगवंताकडे डोळ्याला डोळा भिडून पहायचे आहे. हा काही खेळ नाही. भगवंताच्या अति प्रभावी डोळ्यासमोर लाचार, दिन, दुबळा बनलेल्या आणि ज्याचे नाक कापले गेले आहे अशाची काय ताकद आहे की तो भगवंता समोर डोळ्याला डोळा भिडून पाहील? आमुकेक प्रकारचे जीवन जगला असेल तरच भगवंताकडे तो face to face पाहू शकेल. चित्त एकाग्र करतेवेळी दहा दिशांना काय चालले आहे ते पाहण्याचे कारण नाही. दिशाकडे पाहू नका याचा अर्थ डोळे बंद करा असा होतो. दहा दिशांना तोंड फिरवू नये हा अर्थ तर स्थिरतेत आलाच. तेव्हा पूर्व दिशेला तोंड करून बसला असाल तर पूर्व दिशेला पाहू नका, डोळे बंद करून बसा.
डोळे मिटून चित्त एकाग्रता करायला बसल्यानंतर दाहाही दिशांमध्ये आपल्यासाठी काय बोलले जाते ते देखील ऐकू नका. मी डोळे मिटून बसणार, भक्तीचा रस चाखणार म्हणजे लोक थोडी थट्टामस्करी करणारच. 'फार भगत होऊन फिरता, पण काय मिळाले?' आहो पण तो भक्ती करतो त्यात त्याला काही मिळो, वा न मिळो, तुझे काय जाते? त्यातून त्याला काही मिळणार नाही. तर मग तो भक्ती करतो, कष्ट करतो त्यात तुझ्या बापाचे काय जाते? लोक वाटेल ते बोलतात, लोकांचे मत विचारू नका आणि त्यांचे ऐकू येऊ नका. त्यांची मते चांगली असतील तर तुम्ही चढून जाल आणि वाईट मते असतील तर तुम्हाला अपमानित झाल्याचे वाटेल. म्हणून लोकांचे मत विचारायला जाऊ नका. मत घ्यायचेच असेल तर गुरूकडे जा.
दहा दिशांना पहात बसू नका, याचा अर्थ असाही होतो की उघड्यावर बसू नका, बंद खोलीत चित्त एकाग्र करायला बसा. निसर्गामागे वेडे झालेले ऋषी चित्ते एकाग्र करण्याचे वेळी निसर्गात मोकळ्यावर न बस्था गुहेत जाऊन ध्यान लावून बसत ते आपल्या लक्षात असू द्या.
Comments
Post a Comment