ऋषी यांसारखे महापुरुष देवा समान आहेत.
तर्पण
आपल्या सारखी सामान्य माणसे तर आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी जगात जन्म घेतात. लहान मुली भातुकलीचा खेळ खेळतात, तेव्हा आईला त्यांच्याबरोबर हा खेळ खेळण्यात कोणता आनंद मिळणार असतो? जे जीवनात खरा भात शिजवून सगळ्यांना जेवून घालते तिला खेळातला खोटा खोटा भात शिजवण्यात कोणता आनंद मिळत असेल ते सांगणे कठीण आहे. तसेच त्या लोकांचे आहे. जीवनात ज्यांनी परमोच्च आनंद अनुभवला आहे ते लोक संसारात कशा करता येत असतील?
घटकाभर असे मानू की जग सुधारण्यासाठी भगवंताने त्या लोकांना पाठवले असेल. तर मग प्रश्न उभा ठाकतो की भगवंताला जग बदलायचे असेल तर तो वर बसून जग बदलू शकत नाही का? पण थोडा खोलवर विचार केला तर अशीही शक्यता वाटते की त्यांच्या इथे येण्याने भगवंताला आनंद वाटत असेल आणि भगवंतापासून अलग होऊन भगवंताला हाक मारण्यात या लोकांना भक्तीचा आनंद मिळत असेल. असे शक्य आहे की भगवंताची व त्यांची खाजगी गणती देखील होत असेल पण त्यांची नावे जाहीर होत नसतील. इतर सर्वांचे होतात पण त्यांच्या खात्याचे ऑडिट कोण करणार?
खरे विचाराल तर अंतर या जगातून अत्रि, वशिष्ठ या सर्वांना बाद केले तर या जगात पाहण्याजोगे काही आहे का? तुमच्या अंगाणात अशा प्रकारचा अतिथी आला असेल आणि त्याला ओळखण्याची हिंमत असेल तर जरूर त्यांचे पूजन करा. या जगात आलेले हे जागतिक अतिथी आहेत आणि म्हणून आपल्या शास्त्रकारांनी रोज त्यांचे सकाळी आठवण करून तर्पण करायला सांगितले आहे.
किती जणांचे तर्पण करायला सांगितले आहे त्यांची नावे ही कोणी ऐकले नसतील. शिवाजी, राणाप्रताप यांची नावे इतिहासात आहेत. आणि ती शिकवण्यात येतात त्यामुळे ते ठाऊक आहे. मराठा कुळाचे किंवा मोगल कुळांची नावे ठाऊक नसले तर परीक्षेत मार्क मिळत नाहीत, म्हणून ती लक्षात ठेवावी लागतात. पण ऐतरेयांची नावे ऐकण्याची तुम्हाला काय गरज आहे. सर्वांची नावे तुम्ही कधी ऐकली आहेत काय? त्यांची नावे जगाच्या इतिहासात मिळत नाहीत. पण वस्तुतः ही मंडळी भगवंताच्या 'कुळा' तली आहेत! ते खरे अतिथी आहेत.
थोडक्यात हे असे महापुरुष आहे की ते जर आपल्या घरी आले तर देव समजून त्यांचे पूजन करा.
Comments
Post a Comment