भगवंत कार्यात असणारे जे जीवन यशस्वीच असते.
कार्य यशस्वी व्हावे अशी इच्छा बाळगणे ही वेगळी गोष्ट आहे. यश मिळालेले पाहून उत्साहाने धावणारे आसे वराती लोक कार्यात असू नयेत.
सामाजिक कार्याचा लोक रिपोर्ट छापतात. तो पाहिल्यावर लोक कार्यात रस घेतात. कार्यात यश मिळाले तर म्हणतात, 'आम्ही तुमच्याबरोबर आहोत' आणि अपयश मिळाले तर म्हणतात, 'आम्हाला पहिल्यापासूनच वाटत होते की या कार्यात काही दम नाही'. असे लोक कार्याला आपले मानत नाहीत. भगवंताचे कार्य हे माझे कार्य आहे, संस्कृतीचे कार्य आहे, अशी दृढतर भावना ज्यांची असेल अशा लोकांना पुण्य मिळते, त्यांचे जीवन यशस्वी होते.
प्रभूकार्यात यश मिळेल किंवा मिळणार देखील नाही, परंतु माणसाचा अध्यात्मिक विकास तर होतोच ही गोष्ट माणसे विसरून जातात. यश मिळाले नाही तर कार्य सोडून देतात किंवा कार्यातील त्यांची गति मंदावते. ज्याची कृती आणि विचार हे दोन पंख स्थिर असतील त्याचाच अध्यात्मिक विकास होऊ शकतो. म्हणून शरीराच्या स्थैर्यबरोबर आचार विचारांचे, कार्यांचे आणि उपास्यांचे, अशी तीनही स्थैर्य असायला हवीत.
Comments
Post a Comment