गोकुळाष्टमी
गोकुळाष्टमी
कृष्णपक्षाच्या अष्टमीच्या चंद्राप्रमाणे एका पायावर भार देऊन, पाय वाकडा ठेवून, शरीराला कमनीय वळण देऊन उभा राहिलेल्या मुरलीधर आणि ज्या दिवशी संसारात पदार्पण केले तो दिवस इतिहासात अमर झाला आहे. मेघांचा गडगडात होत आहे, बिजली कडकडत आहे, मुसळधार पाऊस पडत आहे अशावेळी श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. जेव्हा जीवनात अंधार दाटतो, निराशेचे उदास वातावरण पसरते, आपत्तीचा पाऊस पडतो, दुःख-दैन्याचे काळे मेघ धमकी देत गडगडाट करतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जन्म घेतो.
व्याप्त अंधारात जेव्हा प्रकाश- किरण दिसतात, उषाकालचा रवी जेव्हा स्वतःची आभा पसरवितो त्यावेळी कोणाचे ह्रदय आनंदाने पुलकित होणार नाही? साम्राज्यवादाच्या चंद्राचेंगरी चिरडल्या जाणाऱ्या समाजाला जेव्हा तारणारा भेटतो, सत्ता व संपत्ती यांच्या शोषणापासून सोडवणारा मुक्तिदाता मिळतो, गरीब व उपेक्षितांना सहानुभूती देणारे उद्धार हृदय मिळते, पडलेल्याला उभा होण्यासाठी आसरा मिळतो आणि अध्यात गटांगळ्या खाणाऱ्याला एखादा उद्धारक मिळतो त्यावेळी आनंद विभोर बनवून कोण नाचणार नाही? सर्वच नाचतील. मुक्तिदात्या, गीतेच्या उदगात्या, लोकांना तारणाऱ्या अशा उद्धारकृष्णाचा जन्म झाला त्यावेळी सर्व लोक दुःख, संताप विसरून आनंदोल्लासात असेच नाचले आणि तो दिवस गोकुळाष्टमी म्हणून प्रसिद्धी पावला.
भारतात आनंत अवतार झाले. नर रत्नांची परंपराच भारतात आहे. एकेका गुणासाठी, एकेका तत्त्वासाठी, एकेका ध्येयासाठी जीवनच्या जीवने ह्या देशातील लोकांनी अर्पण केलेली आहेत. अशा भारत देशातील रत्नात शोभणारा कौस्तुभ मणी म्हणजे श्रीकृष्ण! यशस्वी मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल तसाच ज्ञानियांचे व जिज्ञासूंची जिज्ञासा पूर्ण करणारा जगद्गुरु म्हणजे कृष्ण. त्या कृष्णाला अनंत प्रणाम!
सर्वच दृष्टीने कृष्ण पूर्ण अवतार आहे. त्याच्या जीवनात कोणत्याही ठिकाणी नावे ठेवायला जागा नाही. एकही स्थान असे नाही की, जेथे उणीव दिसेल, आध्यात्मिक, सामाजिक, नैतिक किंवा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी कृष्णासारखा समाजध्दारक दुसरा कोणी झालेला नाही. कृष्णाच्या बरोबरीला उतरेल असा राजनीतिज्ञ जगात कोठेही पाहायला मिळत नाही. अध्यात्म तर भगवान श्रीकृष्णाचेच. कृष्ण म्हणजे नर रत्नातील कौतुक मणी. कृष्णाने निरपेक्ष राहून रात्रंदिवस संस्कृतीसाठी कार्य केले. रात्रंदिवस राजकारणात रमणारा निरपेक्ष राऊत शकत नाही. पण कृष्ण त्याला एक अपवाद आहे म्हणूनच तो धर्म व तत्वज्ञानाने राज सत्तेचे नियंत्रण करू शकला.
ज्या काळात धर्म -सिद्धांत केवळ पुस्तकातच राहिले होते त्या काळात कृष्ण जन्मला. सत्ता किंवा संपत्तीशिवायही शेकडो लोकांची संघटना करणं शक्य आहे हे त्याने गोकुळात कशी संघटना करून दाखवून दिले. 'कर्षति आकर्षति इति कृष्ण' जो खेचतो, आकर्षण घेतो तो कृष्ण. कृष्णाने गवळ्यांना एकत्रित करून त्यांचे प्रेम संपादन केले. कृष्णाच्या सांगण्यावरून गोकुळातील लोकांनी वर्षानुवर्ष परंपरागत चालत आलेली इंद्रपूजा तोडून टाकले व गोवर्धनाची पूजा सुरू केली. या संघटनेने कंस, जरासंध इत्यादी लोकांच्या मान्यतेला मोठा धक्का बसला. कृष्णाने सामान्य माणसाला समजावले. खिशात भले दीडक्या नसतील पण त्याच्याशी पणे व निष्ठेने एकत्रित होऊन श्वास सोडला तर जग बदलून जाईल. भागवत कार्यात शाठय न राखता, लबाडी न करता रहा, प्रभू तुमच्या पाठीशी उभाच आहे.
Comments
Post a Comment