मत्स्यगंधा पूजन
सागर पूजन
हा उत्सव सहासिक व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा उत्सव गणला जातो. समुद्रावर सत्ता चालवणाऱ्या वरून देवाने, पूजेने प्रसन्न होऊन माल आणता - नेताना वाहनांना नुकसान पोहोचू नये असा भाव ह्या समुद्र पूजनामागे असू शकतो. लोहाणा ज्ञातीचे लोक दर्या लालला स्वतःचा देव मानतात आणि संपूर्ण वर्ष त्याचे पूजन करतात.
या उत्सवा द्वारे प्राचीन भारताच्या व्यापार - उद्योगाची स्मृती ताजी होते. त्या दिवशी इजिप्त, गिरीष, लंका, ब्रह्मदेश, चीन, जावा इत्यादी देशात जाऊन स्वतःच्या देशाची संपत्ती वाढवणारे व्यापारी पूर्वज तसेच कला- कौशल्य, तत्त्वज्ञान, धर्म, देवता इत्यादींचा प्रचार करणाऱ्या संस्कृती- वीरांची पुण्यशील व प्रेरणादायी स्मृती, सागरात नारळ फेकताना ताजी करायची असते.
'सागरे सर्व तीर्थानि'... नदीपेक्षा संगम व संगमा पेक्षा सागर अधिक पवित्र आहे, असे ऋषींनी सांगितले आहे. गीताकारांनी स्थितप्रज्ञाची तुलना सागरा बरोबर केली आहे. स्वतःमधील सर्व घाण -कचरा घेऊन नद्या सागराला मिळतात तरीही अचल समुद्र स्वतःच्या प्रतिष्ठेपासून चलीत होत नाही, तसा स्थितप्रज्ञ देखील सर्वकामनाने त्याच्या मध्ये प्रवेश केला तरी शांती व स्थिरता गमावत नाही.
Comments
Post a Comment