वेदधर्माचा उपदेश अमलात आणला पाहिजे.
वेदधर्माचा उपदेश
वेदाध्ययन पूर्ण करून घेतल्यावर आचार्य शिष्याला पुढील प्रमाणे वेदधर्माचा उपदेश करत आहेत. सत्य बोल, धर्माचे आचरण कर, स्वाध्याय -वेदाध्ययन करण्यात कधी प्रमाद करू नकोस. आचार्यांना अभिष्ट गुरुदक्षिणा दिल्यानंतर, प्रजासूत्राला- संतान परंपरेला छेद देऊ नकोस अर्थात् ब्रह्मचारी आश्रमात राहिल्या नंतर गृहस्थाश्रम पाळण्यास प्रवृत्त हो. सत्याचा कधीही त्याग करू नकोस. धर्माचा कधी त्याग करू नकोस. कुशल कर्मात- कामात करू नकोस. ऐश्वर्यादायी, मांगलीक
कर्मात परमाद करू नकोस. स्वाध्याय- प्रवचन अर्थात् स्वतःचा अभ्यास तसेच दुसऱ्यांना उपदेश करण्यात कधी प्रमाद करू नकोस. देव कार्य तसेच पितृ कार्य यांचा कधी त्याग करू नकोस. आईला देव मानून तिची उपासना कर. पित्याला देव समजून त्यांची उपासना कर. आचार्यांना देव समजून त्यांची उपासना कर. अतिथीची देव समजून उपासना कर. जी जी कार्मे निंदारहीत आहेत तीच तू कर. इतर कर्मे कधी करू नकोस. आमचे सूचरीत- श्रेष्ठ आचरणच तू अनुसरावे अन्य नाही. जे ब्राह्मण आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असतील त्यांना अविलंब बसायला असन द्यावे. तू जे काही देशील ते श्रद्धेने दे. अश्रद्धेने देऊ नकोस. तुला तुझ्या ऐश्वर्या चा अनुसार यथाशक्ती दान केले पाहिजे. लोक लज्जेपोटी आणि भीतीने तरी तुला दान केले पाहिजे. विवेक पुरस्सर दान केले पाहिजे.
जर कधी तुझ्या स्वतःच्या कोणत्याही प्रकारच्या कर्मा विषयी अथवा लौकिक आचरणाविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली तर जे वेदविहित कर्मात विचारशील, कुशल, सर्व प्रकारे स्वतंत्र क्रोधरहित अर्थात शांत स्वभावाचे, धर्माची कामना बाळगणारे ब्राह्मण वर्तन करतात त्याचप्रमाणे तुझे वर्तन राख. एखाद्या निंदित पुरुषासोबत ते ब्राह्मण ज्याप्रमाणे वर्तन ठेवतात त्याप्रमाणेच तू वर्तन ठेव. हा शास्त्रांचा आदेश आहे, उपदेश आहे. हे सर्व वेदो उपनिषदांचे सार आहे. ते अनुशासन आहे, अज्ञारूप आहे. वर सांगितल्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. खरोखर वर सांगितल्याप्रमाणे सर्व अनुसरले पाहिजे
Comments
Post a Comment