शितला सप्तमी

लेखणी असो, तलवार असो, नांगर असो वा तराजू, शेगडी असो, वा झाडू असो प्रत्येक वस्तूला पवित्र मानण्यातच तिचे पूजन पूर्ण होत नाही; तर प्रत्येक वस्तूची पवित्रता टिकून धरण्यात ते उत्कृष्ट ठेवण्यातच तिच्या पूजेची पूर्णहूती होते. जे कर्म वाट्याला आले ते कर्म उत्कृष्ट रीतीने करणे हे कर्माचे पूजन आहे. तशी मिळालेली वस्तू उत्कृष्ट राखणे हे त्या वस्तूचे पूजन आहे. आपल्या वस्रांना आपण स्वच्छ व पवित्र ठेवतो ही आपल्या वास्रांची पूजा आहे.
    
दात स्वच्छ व सफेद ठेवणे, शरीर स्नानादि करून स्वच्छ ठेवणे, केस विंचारणे वगैरे सर्व त्यांच्या पूजा आहेत. सणासुदीच्या दिवशी स्वतःच्या वाहनांना हार घालणारा माणूसही त्याची पूजाच करतो. त्याचप्रमाणे सोपविलेले काम उत्तम रीतीने करणे ही त्या कामाची पूजा आहे. उत्कृष्ट अभ्यास करणे, आई-वडिलांच्या अज्ञाचे पालन करणे, गुरूची सेवा करणे इत्यादी सर्व कर्म पूजाच आहे. 
   
साधन पूजा व कर्म पूजा यांचे महत्त्व खऱ्या अर्थाने जो समजून घेतो. त्याच्यावर शीतला माता प्रसन्न होते. तोच जीवनात शीतलता अनुभवू शकतो. शितला माता सेवेची देवता आहे. सेवा करणारा जेवढी अंतरिक्ष शांती प्राप्त करू शकतो तेवढी शांती दुसरा कोणी मिळवू शकत नाही. सुप व केरसुणी सारख्या क्षुद्र साधनांना त्यांची उपयोगिता पाहून त्यांना स्वतः जवळ ठेवण्यात आलेले आहेत. त्यांची पूजा केल्याने बालकांना रोग होत नाहीत. सुपाने स्वच्छ केलेले शुद्ध अन्नधान्य खाण्यात आले व राहण्याची स्थाने केरसुणीने स्वच्छ करून व व्यवस्थित ठेवण्यात आली तर रोगाचे प्रमाण घटते. असा हा उत्सव आपल्याला संदेश देतो.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.