ध्येयवादी असणे हा श्रुतीचा आदेश आहे.

श्रुतीचा आदेश

प्रभो! आयुष्यात कोणालाही ध्येयहीन जीवन देऊ नकोस. सकाळी उठला, क्लब मध्ये गेला, तिथून येऊन चहा प्यायला, चार मित्रमंडळी सोबत चिवडा खाल्ला, ऑफिसला गेला, ऑफिसमधून आल्यावर कुठल्यातरी पार्टीला गेला किंवा सिनेमा, नाटक बघायला गेला, रात्री बारा वाजता घरी येऊन झोपी गेला. हेच काय जीवन आहे? अशा आळणी जीवनाला काहीच अर्थ नाही.
      
मला काही करायचं आहे अशी भावना असली पाहिजे, जीवनात ध्येय असले पाहिजे आणि असे ध्येय की जे मांगल्याकडे घेऊन जाईल. जीवनाला सत्यं शिवं सुंदरम् बनवेल असे ध्येय जीवनात बाळग. म्हणून ध्येयपूजा, देवपूजा जीवनात बाळगण्याचा श्रुतीचा आदेश आहे.
  

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.