भगवान श्रीकृष्ण अवतार.

भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे जीवन एवढे सुंदर वस्तू संबंधित बनवले होते की, जो कोणी त्याच्याकडे पाहिल त्याला तो आपला वाटत होता. वृद्धांना स्वतःच्या मुलासारखा वाटत होता. तरुणांना मित्र वाटत होता. राजांना तो राजासारखा वाटत होता तर भक्तांना स्वयं भगवान वाटत होता. सर्वांना त्याच्यावर प्रेम करण्याचा उमाळा येत होता. आजही आपणाला कृष्ण तेवढाच आकर्षक वाटतो. रोज नि रोज तोच सूर्य उगवतो पण केवढा आनंद होतो! पक्षी तेवढाच आनंदाने किलबिल करतात. गोकुळाष्टमी तशीच प्रत्येक वर्षी येते पण केवढा आनंद देते! कृष्णाचे जीवनच तसे आहे. गोकुळाष्टमी म्हणजे प्रभू प्रेमिकांच्या आनंदाची पराकाष्ठा.
    
कृष्णाने सर्वांच्या हृदयाला जिंकले होते. सामान्य लोकांत त्याने आत्मप्रत्ये उभा केला. गवळ्यात मिसळून त्यांना धर्मयुद्ध जागविले. त्याने आधारुर्व बकासुर यांना मारले. अद म्हणजे पाप व बक म्हणजे दंभ. गोकुळातील पापी विचारांच्या व धम्मिवृत्तीच्या लोकांचा त्याने नाश केला. कालिया हा नाग जातीचा होता. स्वतःच्या विषारी व विकारी विचारांच्या प्रचाराने तो यमुनेच्या आसपासच्या प्रदेशातील लोकांना त्रास देत होता. त्या कालिया नागाचाही श्रीकृष्णाने नाश केला. इंद्राचे पूजन म्हणजे वैभवाचे पूजन. लोक पैसा वाल्याचे पूजन करीत होते ते बंद करून भगवंताचे 'गो' म्हणजे उपनिषदाचे वर्णन करणाराचे त्यांच्या विचारांचे व प्रचार करणारांचे पूजन करून सुरू केले. त्यामुळे दैनिक रागावले परंतु गोवर्धन समूहा पुढे त्यांचं काही चाललं नाही.
    
भगवान श्रीकृष्ण लहान होता त्यावेळी घराघरातून लोण्याची चोरी करीत होता आणि ते लोणी सर्व गोपाळांना वाटून खात होता. त्यामुळे सर्व गोपाळ धष्टपुष्ट होत होते. लोणी म्हणजे नवनीत, अर्क, सार. प्रत्येक घरात जे सार रूप असे जे काही घेण्याण्यासारखे सद्गुन होते ते सर्व श्रीकृष्ण गोपाळ बालकाम जवळ प्रदर्शित करीत होता. असे घराघरातील व व्यक्ती व्यक्तीमधील लोणी तो सर्व गवळ्यांना खाऊ घालत होता. त्याने त्यांचे जीवन पष्ट होत होते. त्यामुळं आतल्या आत होणारे क्लेश, कलह, खरेखोटेपणा राहतच नसत. सर्व प्रेमाने शांतीने राहत होते.
     
राम व कृष्ण, दोघांची परंपरा वेगळी आहे. कौटुंबिक आयोग्य नजरेसमोर ठेवून रामाने समाज विकासाचा रस्ता दाखविला तर कृष्णाने सामाजिक ऐक्या नजरेसमोर ठेवून समाजाचे नियमन केले. दांभिक, खोटे, लुच्चे, स्वार्थी आणि भोगलंपट लोक आपले स्वजन होऊच शकत नाही; भले मग ते मामा, मावशी किंवा आत्या कोणीही असोत. जोपर्यंत ते आपल्या सांस्कृतिक विकास कार्यात आडवे येत नाही तोपर्यंत त्यांना कोपऱ्यात बसू द्या. पण आडवे आले तर शेंडी पकडून उडून लावावे, हीच त्याची नीती होती.
      

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन