दैवी वैभव - मी कोणत्यातरी ध्येयचा आहे.


दैवी वैभव
    
जसा 'मी आहे' चा सुवास आध्यात्मिक वैभव आहे, 'मी प्रभूचा आहे' हे भक्तीचे वैभव आहे त्याचप्रमाणे 'मी कोणत्यातरी ध्येयाचा आहे' हे दैवी वैभव माणसाने जीवनात मिळवायचे आहे.
      
शक्य आहे की 'मी प्रभूचा आहे' या स्टेजपर्यंत माणूस पोहोचला नसेल किंवा 'मी आहे' पर्यंत माणसाची आध्यात्मिक झेप पोहोचली नसेल तर 'मी कोणत्यातरी ध्येयासाठी जीवन जगतो मला माझे जीवन दैवी बनवायचा आहे' असे ध्येय तरी जीवनात असले पाहिजे. एक संत म्हणतात ना-अवघाची संसार सुखाचा करीन
 सगळ्या लोकांना सुखी करीन. सगळ्यांच्या ओठावर प्रभुनाम खेळेल असे पाहिन. सर्व लोकांच्या जीवनात भव्यता, दिव्यता आणिन, असे ध्येय जीवनात बाळगले पाहिजे. ज्यांच्या जीवनात काही ध्येय नाही, जे ध्येयरहित आहे ते जीवन आळणी आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.