श्रावणी पौर्णिमा आणि उपनयन संस्कार

श्रावणी पौर्णिमा 

ज्ञाननिष्ठ ब्राह्मणांचा यज्ञोपवित बदलण्याचा उत्सव, भक्ती प्रधान बंधू भगिनींचा रक्षाबंधनाचा उत्सव व कर्मवीर व्यापाऱ्यांचा समुद्र पूजनाचा उत्सव अशा तीन उत्सवांचा त्रिवेणी संगम म्हणजेच श्रावणी पौर्णिमा.

उपनयन संस्कार 

यज्ञोपवित धारण करायच्या संस्काराला संस्कारात उपनयन संस्कार असे नाव देण्यात आलेले आहे. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. ज्या संस्काराने विद्यार्थ्याला गुरु जवळ देण्यात येते तो संस्कार म्हणजे उपनयन संस्कार. यज्ञोपवित धारण करणाऱ्याने वेदनिष्ठा धारण करायची असते आणि वेदनिष्ठा घेतलेल्या शिष्यालाच गुरु ज्ञान देतो; त्यालाच गुरु दीक्षा देतो. दीक्षा म्हणजे जिस दिशा दाखवते, ती दृष्टी देतो. यज्ञापवीत धारण केल्यानंतर गुरु जवळ जाणाराला कर्तव्याची दिशा व जीवनाची दृष्टी प्राप्त होते. या दृष्टीने उपनयनाचा अर्थ दुसरा डोळा, नवीन दृष्टी असाही होऊ शकतो.
    
उपनयन संस्कार हा दिव्य संस्कार आहे. त्याच्याद्वारे मानवाला नवा जन्म मिळतो. तो त्याचा दुसरा जन्म आहे. जन्मना जायते शूद्रा: 'संस्कारात् द्विज उच्चते|' उपनयन संस्कार म्हणजे तेजस्वी जीवनाची दीक्षा. जाणवे देताना बटूला लंगोटी नेसवतात. लंगोटी बांधणे म्हणजेच विषय वासनावर ताबा ठेवणे. पसरल्या जाणाऱ्या सूर्यकिरणांना बहिर्गोल काचेमध्ये एकत्रित करण्यात आले तर त्यातून आग्नि निर्माण होतो. त्याप्रमाणे उधळली जाणारी, पसरली जाणारी, स्खलित होणारी वीर्य शक्ती बांधून ठेवण्यात आली संयमित करण्यात आली तर त्यातून प्रचंड शक्ती निर्माण होते. लंगोटी म्हणजे जीवनात भोगाला प्राधान्य न देता त्याला दिलेले प्राधान्य. सुखाला मिठी न मारता साधेपणाला आलिंगन देणे. साधेपणा असेल तरच विद्यार्थी विद्यासंपन्न होऊ शकतो.
    
जानवे घेताना कमरेला मेखला बांधावी लागते. मेखला बंधन म्हणजे वृत्त बंधन. मेखला बंधन म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणीशी कंबर कसून संघर्ष करण्याची तत्परता. मेखला बंधन म्हणजे जीवनातील दैवा सुर संग्रामांमध्ये आसुरी वृत्ती विजयी न व्हावी यासाठी सतत जागृती.
    

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन