श्रीकृष्ण
भगवान श्रीकृष्ण म्हणजे दैवी संस्कृतीचा नि:ष्पृह, निरंकारी व नम्र उपासक. संस्कृतीसाठी त्याच्या आतड्या तुटत होते. म्हणूनच तर दुर्योधन, कंस, कालवन, नरकासुर, शिशुपाल व जरासंघ यांच्यासारखे जडवादी, असुरी संस्कृतीचे प्रचारक तांडव नुसत्या करीत होते तेव्हा धर्म व नेते यांचे सुदर्शन चक्र हातात घेऊन त्याने या षडरिपूंचा नाश केला. संस्कृती प्रेमी पांडवांना तो नेहमीच मार्गदर्शक राहिला. अर्जुनाच्या रथाप्रमाणे त्यांचा जीवन रथही प्रभुत सांभाळत होता. अटीतटीच्या प्रसंगात आणि अतिशय वाईट काळात त्याने बांधवांना सावरलेला आहे.
'वैयक्तिक प्रतिज्ञा व निष्ठा यांनी कार्यालहाने पोहोचत असेल तर कार्यरक्षणामुळे वैयक्तिक निष्ठा किंवा प्रतिज्ञानामुळेच महत्त्व देऊ नका' असा एक सुंदर सिद्धांत त्याने पांडवांना समजावला होता. त्या सिद्धांताच्या आचरण करूनच पांडवांचा विजय झाला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन युधिष्ठिराला 'नरो वा कुंजरो वा' बोलावे लागले, भिमाचा दुर्योधना बरोबर च्या गदायुद्धात भीम नियमाविरुद्ध जाऊन दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारतो; अर्जुन कार्णाच्या रथाचे चाल जमिनीत होते त्यावेळी नि:शास्त्र अशा कार्णावर बाण मारतो. याच्या उलट द्रोण, भीष्म व कर्ण स्वतःच्या वैयक्तिक भूमिका सावरायला गेले. परिणामतः गौरवांचा पराभव झाला. भीष्म म्हणतात : 'मी शिखंडिशी लढणार नाही' द्रोण म्हणतात, 'अश्वस्थामा मेल्यावर लढणे काय कामाचे' तर कर्ण म्हणतो, 'जोपर्यंत भीष्म रणांगणात लढत आहे तोपर्यंत मी युद्ध करायला येणार नाही' असे सर्वजण आपापली प्रतिज्ञा सांभाळायला गेले. त्यामुळे त्यांचा पक्ष हरला. भगवान श्रीकृष्ण आपल्याला हाच पाठ शिकून गेला की, व्यक्तीची मते किंवा आग्रह जर सांस्कृतिक कार्यात आडवे येत असतील तर त्यांना मुळीच किंमत देऊ नका. आपणही सतत पाहत असतो की, आपले विचार कार्याला बाधा रूप होत नाहीत ना? यावरून कोणी अशी समजूत करून घेऊ नये की, कृष्ण म्हणजे वैयक्तिक प्रतिमा, वैयक्तिक मानापमान, वैयक्तिक प्रतिज्ञा यांच्याविरुद्ध होता; तर या निष्ठेने, ज्या प्रतिज्ञाने विकसनशील कार्याच्या परंपरेत अडथळे येतात ती निष्ठा, निष्ठा नाही. ती प्रतिज्ञा, प्रतिज्ञा नाही. आणि तो धर्म, धर्म नाही, अशी त्याची स्पष्ट कल्पना होती.
कृष्णाची मूर्ती समोर पाहताच कधी असेही वाटते, मुरली किती भाग्यवान आहे! तिला प्रभुणे स्वतःच्या ओठावर धारण केलेले आहे आणि त्यातून प्रभू मधुर सगळी निर्माण करीत असतो. माथ्यावरचे मोरप्वेज किती भाग्यशाली आहे! त्याला प्रभुणे मस्तकावर धारण केले आहे आणि या गुंजाच्या माळांची तर गोष्टच नको! ज्यांना प्रभुणे गळ्यात धारण केले आहे, हृदयाशी धरलेलं आहे, जवळ उभी असलेली गाय किती भाग्यवान आहे! प्रभू तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत आहे. ते सर्वजण न बोलता आपल्याला काही सांगत आहेत. त्यांची मुख वाणी आपणा सर्वांना कर्तव्याचे भान करून देते. जीवनाची दिशा समजते. आपण सर्वांनी ही वाणी भावनांच्या कानाने ऐकून, जीवनात कार्यान्वित करून, प्रभू प्रिया बनवून त्याचे सानिध्य साधण्यासाठी प्रयत्नशील बनले पाहिजे.
भगवान केवळ भावाचा भुकेलेला आहे. भावाने ठेवलेला रुक्मिणीच्या तुलसीदादा नेतो तोला गेला. दुर्योधनाच्या 56 भावांचा त्याग करून विदुरा घरची भावाने भरलेली भाजी भाकरी खाल्ली, एवढेच नाही तर भावाने त्यांचे काम करण्याची तयारी दाखविली. ज्यांनी त्याचे काम करण्याची तयारी दाखविली. त्यांचे लहानात लहान व कमी दर्जाचे काम देखील भगवान श्रीकृष्णाने केले आहे. राज सूर्याज्ञा त्याने पत्रावळी काढण्याचे काम केले. आणि अर्जुनाच्या रथा व सार्थी म्हणून त्याचे घोडे त्याने धुतले. आपणही खऱ्या भावानेने भगवंताचे काम करायला लागलो तर प्रभू आपल्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही.
जगाचा इतिहास नेहमी प्रवृत्ती व निवृत्ती याच्यात झुलत राहिलेला आहे. या दोघांचा समन्वय भगवान श्रीकृष्णाने साधलेला आहे. गीतेत तुलनात्मक विचार मांडून प्रवृत्ती व निवृत्ती यांचे माध्यम त्याने दिले आहे. त्याने जीवनातील कर्मयोग समजावला आहे, म्हणून तो जगद्गुरु आहे. भक्ती व ज्ञान जाने जीवनात उतरवले आहे अशा निष्काम कर्मयोगाचे ज्ञान श्रीकृष्णाने गीते दिले आहे. गीतेचे श्लोक स्वतः भगवंताने गायलेले आहेत. त्याचे ज्ञान झोपलेला लावून बसवते, त्याचे विचार मेलेल्या चैतन्य भारतात. आज सर्व जडवादांच्या भवऱ्यात सापडलेले आहेत. कोणामध्येच निर्भयता नाही. विजयाची अंतकरणापासूनची इच्छा नाही. कारण, निर्भय व विजयी श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान ते समजले नाहीत. त्यांच्या जीवन गोकुळात श्री घोषणाचा जन्म झाला नाही, श्रीकृष्णाच्या मुरलीच्या सुर संगीतात ते कधी मस्त बनले नाहीत. त्या सर्वांना आज कृष्णाची मुरली ऐकण्याची गरज आहे. कृष्णाच्या मुरलीचे संगीत म्हणजे गीता. ती त्यांना जीवनात ध्येय देईल. ध्येयनिष्ठ जेवण लोकांना तेजस्वी व तपस्वी बनविली. पराक्रमी व पुरुषार्थी बनवेल. त्यांना जीवणात जगण्यासारखे काही आहे असे वाटेल.
Comments
Post a Comment