क्रियासिद्धी - रावण आणि राम यांच्यातील a look
क्रियासिद्धी
रावणाला जसा अहंकार होता तशी रामाला सुद्धा मीजास होती.
विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधि:
विपक्ष: पौलस्त्यो रणभुवि सहायाश्च कपय:|
तथाप्येको राम: सकलमवधिद्राक्षसकूम्
क्रियासिद्धी: सत्वे भवति महातां नोपकरणे||
रामाला सागर पार करून लंका जिंकायची होती. विपक्षात रावण होता आणि रणभूमीवर रामाचे सहाय्यक होते वानर, तरीही एकट्या रामाने समग्र राक्षस कुळाचा संहार केला. महापुरुषांची सिद्धी साधनांमध्ये नसते, त्यांच्या सत्वात असते. लंका हे काही लहान सान राष्ट्र नव्हते. त्याकाळचे ते अतिशय समर्थ राष्ट्र गणले जाई. त्याच्याकडे सर्वच प्रकारचे शस्त्र होती. त्याच्या समोर नजर वर करून बघण्याची कोणाची ताकद नव्हती. अशा समर्थ राष्ट्राचे आणि बलवान रावणाशी लढून त्याचा पराभव करणे सोपे नाही, असा विचार करून कोणत्याही माणसाने लढायचा विचार सोडून दिला असता. परंतु राम अशी माघार घेणाऱ्यापैकी नव्हता. 'मी नाही लढणार तर दुसरा कोण लढणार? मीच लढणार आणि रावणाचा पराभव करणार.' असे बोलणारा राम आणि 'मीच लढून रामाचा पराभव करणार असा बोलणारा रावण होता. थोडा देखील पूर्वग्रह न बाळगता त्या दोघांची भाषा वाचाल तर तुम्हाला त्यात काहीच फरक दिसणार नाही.
रावणाला स्वतःच्या शक्तीचा गर्व होता. मीच ईश्वर आहे असे रावणाला वाटत होते. आणि रामाला आदिम शक्तीचा गौरव होता. सकाळी पूजा करून पाटावरून उठल्यावर अध्यात्मावादी माणसाचा आवाज तर असुरी वृत्तीच्या माणसापेक्षाही मोठा असला पाहिजे. रामदास स्वामींनी गर्जून सांगितले होते की जी रामकथा मी येथे सांगतो आहे ती ब्रम्हांड भेदून त्याच्याही पलीकडे कोणता लोक असेल त्या जागी जाऊनही ती कथा सांगेन. असे बोलणे हा अहंकार आहे, पण हा प्रभु शक्तीचा अहंकार आहे. ज्याने वेदांचे अध्ययन केले आहे व पचवले आहे अशा सच्चा वेदांतीची भाषा रडकी असणारच नाही. कारण त्याचा अहंकार प्रभुभत्तीचा आहे.
Comments
Post a Comment