वक्त्याची भूमिका - स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे
वक्त्याची भूमिका स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे. स्वाध्याय करणे आणि कथा कीर्तन ऐकण्यात फरक आहे. लहानपणी कथा ऐकल्याने माणूस कार्यासाठी उद्युक्त होत असेल म्हणजे तत्पर होत असेल पण भक्ती क्षेत्रात नारदाने लिहिले आहे तसे न ते राजपरितोषात् क्षुधा शान्तिर्वा || नारद म्हणतात की केवळ ऐकल्याने किंवा क्षुधाशांति होत नाही. ध्रुवाची गोष्ट ऐकल्याने ध्रुवपद नाही मिळत किंवा सुदाम्याच्या गोष्टी ऐकून सुदामपुरी नाही मिळत. म्हणून स्वाध्याय हा कथा, अख्यान, व्याख्यान यापेक्षा वेगळाच आहे. कथा किंवा अख्यान श्रोत्यांना रोचक वाटतात, चांगले वाटतात. त्यांना आवडतील अशा एक दोन गोष्टी वक्त्याने सांगितल्या की आबालवृद्ध सर्व आकर्षित होतात. पण त्यात वक्त्याची भूमिका श्रोत्यांना संतुष्ट करण्याची असते. कारण श्रोते संतुष्ट होण्यावर, खुश होऊन जाण्यावर त्याची जीविका आधारित असते. ...