शेजारी - माणसाने शेजार धर्म कसा पाळावा ?
शेजारी
शेजारी असणे अनिवार्य आहे. शेजाऱ्याशिवाय असलेले घर लोक घेत नाहीत. माणसाचे मानसशास्त्र विचार करण्यासारखे आहे. शेजारी तर असलाच पाहिजे, तो अनिवार्य आहे. पण तो येऊन मला त्रास देऊ लागला तर? ही विवंचना आहे. त्याच्याशी मी अति प्रेमाचा संबंध ठेवीन तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हैराण करेल. एवढ्यासाठीच तर ब्लॉक सिस्टीम आली आणि चाळ सिस्टीम गेली. समोर कोण आहे ते मला बघायचं नाही, जाणायचं नाही. दुसरा पाहिजे, पण दुसरा दूर राहिला पाहिजे. आणि मला जरूर असेल तेव्हा माझ्याजवळ आला पाहिजे. तोपर्यंत मला नको. ही एक अजब गोष्ट आहे.
दुसरी गोष्ट भुकेची तृप्ती. त्यात सर्व प्रकारची भूक आली. इंद्रयांची भूक पण त्यातच आली. त्याची तृप्ती झाली पाहिजे. संरक्षण आणि मनोरंजन यासाठी मला दुसरा पाहिजे. त्याच्याशिवाय माझे चालणारच नाही. दुसरा आला की धर्म उभा राहतो, संकेत उभा राहतो, परंपरा उभी राहते. ते मला बाधा रूप ठरते. आज सर्व लोकसंस्था विरोधी झाले आहेत.
परंतु कोणता नवा रस्ता बनवण्याची हिंमतच नाही. दूरचे पाहण्याची बौद्धिक ताकद नाही. मानव जातीचे चिरंतन कल्याण पाहणे की काय मस्करी नाही.
दुसरा आला की समस्या येणारच आहेत. त्यासाठी दुसरा पाहिजे. दुसरा आला की धर्माचा स्वीकार करा, नीतीचा स्वीकार करा, कायद्याचा स्वीकार करा, असे संकेत येतात. दुसरा आला की परंपरा उभी राहते. परंपरा उभी नाही केली. तर दुसऱ्याला जिवंत राहणे कठीण होईल. आज सर्व शिकलेल्यांना आणि तरुणांना धर्म नको आहे. त्यांना समाज पाहिजे पण धर्म नको. नीती नको, कायदा नकोत, परंपरा नकोत. 'परंपरा, परंपरा काय घेऊन बसला आहात तुम्ही समाजाचे काही संकेत, असे राहा, असे चाला ते मला मान्य नाहीत. त्याचे बंधन मला नको.
लोकांच्या आधारावर सत्तेवर यायचे आहेत परंतु लोकांची माझ्यावर सत्ता नको. मला लोक पाहिजेत कारण की त्यांच्या आधारावरच मी खुर्चीवर येणार आहे. परंतु खुर्चीवर बसल्यावर स्वतःला वाचवायचे आहे. ज्यांच्या आधारे मला चढायचा आहे, त्यांच्यापासूनच मला स्वतःला वाचायचे आहे. ही आजची समस्या आहे. यातून वाचायचा आहे आणि वाचायचा प्रयत्न करायचा आहे. एकटेपणा काढून टाकायचा आहे. एवढ्यासाठीच मला लोक हवेत. परंतु त्यांचा गडबड गोंधळ माझ्याने सहन होत नाही.
Comments
Post a Comment