चित्त एकाग्रताचे रहस्य

 चित्ताकाग्रतेचे रहस्य 
          भक्ती करायची म्हणजे भगवंताची स्तुती करायची असे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेले नाही. जो भगवंताची जास्त स्तुती करेल तो भगवंताला जास्त आवडेल असे नाही, आपल्या विकारांचे, वासनांचे उदात्तीकरण करायचे असेल तर चित्त एकाग्रते शिवाय ते शक्य नाही, सगुण उपासने शिवाय ते शक्य नाही. म्हणजे भक्ती शिवाय शक्य नाही. त्यात दुसरी कोणतीही भक्ती चालणार नाही. केवळ प्रार्थना करणे ही शास्त्रीय भक्ती नाही. संपूर्ण जगात प्रार्थना चालतात, कर्मकांडे चालतात, पण ते चित्त एकाग्रता नाही. त्यामुळे चित्तावर जे परिणाम व्हायला पाहिजे ते होत नाहीत. चर्चमध्ये जाणारे प्रार्थना करतात, काही कर्मकांड करतात. ते कदाचित बायबलचे उतारेही वाचतात, पण त्यांना चित्त एकाग्रतेची कल्पना नाही. तुम्ही आपल्या मंदिरात जाल तर मंदिरातही चित्त एकाग्रतेची कल्पना नाही. मंदिरवाल्यांना, मंदिर बांधणाऱ्यांना, मंदिर चालवणाऱ्यांना कोणालाही चित्र एकाग्रतेची कल्पना नाही.
          ऋषिंनी जे मंदिर उभे केले त्यांच्या विचारांच्या बैठकी चित्त एकाग्रता आहे. बाकी सर्व प्रार्थनास्थळांपेक्षा मंदिरात एकाग्र होणे लवकर संभव आहे. भगवंता! तू महान आहेस आणि चांगला आहेस, केवळ असे बोलून चालणार नाही. अदृश्य भगवंतात चित्त एकाग्र झाले पाहिजे, ध्यान झाले पाहिजे, त्याशिवाय त्याचे उदात्तीकरण होत नाही, हे शास्त्र आहे. जीवन विकसित व्हावे यासाठी योग्य अर्थाने चित्त एकाग्र झाले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन