नीतिमत्ता

 
नीतिमत्ता
           दुसरा आहे पण तो मनुष्य आहे. त्यात मानव्य आहे. मानव्याचा स्वीकार केला की अव्दैत येईल. जसा मी आहे तसाच दुसरा पण आहे. भगवंताने जसे माझे सर्जन केले आहे तसेच दुसऱ्याचेही केले आहे. जे काही मला पाहिजे ते दुसऱ्याला सुद्धा पाहिजे. जर देऊ शकलो तर त्याला देईन, नाही देऊ शकलो तर त्याच्या फायद्याच्या आड येणार नाही. कमीत कमी त्याच्याजवळ जे काही आहे ते खेचून घेणार नाही. ह्या तीन गोष्टी आल्या की नीतिमत्ता आली.
          दुसऱ्याच्या फायद्याच्या आड येणार नाही अशी नीतिमत्ता कशासाठी या प्रश्नाचे उत्तर वेदांत देतो आणि भक्ती देते. यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैत हे एक जीवन आहे. अद्वैत हे एक जीवनदर्शन आहे‌. आणि 'द्वैती' आहोत अथवा आम्ही 'अद्वैती' आहोत असे बोलणेच व्यर्थ आहे. व्दैतामुळे कचरा होतो. पती-पत्नीच्या संबंधात भेद आले की कचरा आला. बाप्पा मुलामध्ये व्दैत आले की कचरा आलाच समजा.
        अव्दैतात भगवंत आहे, अद्वैत्वात सुख आहे, अद्वैताच शांती आह. द्वैतात संघर्ष आहे, व्दैतात दुःख आहे. म्हणूनच अद्वैत जीवन आहे. लोकांनी अद्वैत वादाला चर्चेचा विषय बनवून टाकला आहे. दुसऱ्यावर प्रेम करायचे आहे‌ माणसाला समाजात राहावे लागते. त्याच्याशिवाय चालत नाही. दुसरा नसेल तर मी मोठा पण होणार नाही. मला लहानाचा मोठा करायला सुद्धा दुसरा कोणी पाहिजे. दुसरा आला की समाज आला. मानवाला समाजात राहावे लागते, पण समाजाशी त्याचे जमत नाही, ही अडचण आहे. बाह्यशक्ती पासून माझे संरक्षण व्हावे म्हणून एकत्र राहायचं आहे. बाह्य शक्ती वेगवेगळ्या आहेत. प्रकृतीची शक्ती आहे, लोकांची शक्ती आहे. लोकांची शक्ती स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी आहे. एकत्र झाल्यावर स्वतःचे संरक्षण कसे होईल हे सुद्धा विचार करण्यासारखे आहे. 


Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.