तलवारीच्या धारे सारखे जीवन
तलवारीच्या धारे सारखे जीवन
ज्याला कीर्ती मिळवायची असते त्याला लोकांच्या हृदयात स्थान मिळत नाही. लोकांना सर्वत्र कीर्ती मिळते, त्यांचे नाव होते पण त्यांना लोक हृदयात स्थान मिळवत नाही.
मामाला मारले तर लोक मला काय बोलतील? मावशीला मारलं तर लोकांना काय वाटेल? असा विचार कृष्णाने केला नाही. मला लोकांचे मन सांभाळायचे आहे, जतन करायचे आहे, हा विचारच नाही. तलवारीच्या धारे सारखे जिवन जगला आहे, लोकांना प्रेमही देत गेला आहे. कृष्ण पूर्णावतार आहे. त्याच्या तोला मोलाची त्याच्या बरोबरीने उभे राहील अशी व्यक्ती एकही सापडत नाही.
लोकांचे मन सांभाळणारे लोक बघायला मिळतात, लोकांचे मन जपत, कुरवाळत पुढे चालणारे लोक दिसतात पण कृष्णाने असा विचार केलेला दिसत नाही. ज्याचे मन तुटले आहे अशी माणसे पण त्याच्यावर सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करताना दिसतात.
कृष्ण लोकांचा हृदय सम्राट आहे, याला यश म्हणतात. माणसाचे नाव पुष्कळ ठिकाणी होते. आज पुष्कळ माणसांचे नाव होते पण त्यांनी दहा माणसात, दहा कुटुंबात, हृदयात स्थान मिळवले आहे का? नाही मिळवले, तर मग त्याला यश नाही म्हणत.

Comments
Post a Comment