स्नेह - आपल्या नात्यांमध्ये स्नेह हा कसा असला पाहिजे ?

स्नेह
        समजा, चार चोर हे एकमेकांचे मित्र झाले, तर काय करतील? जास्त चोरी करतील. त्यांच्या मैत्रीने समाजाचे सुद्धा नुकसान आणि त्यांचे स्वतः चे सुद्धा नुकसान. श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखी मैत्री असली पाहिजे.
         स्नेह असला पाहिजे परंतु स्नेह धर्म वाढवणारा असला पाहिजे. स्वधर्मात बाधा आणणारा स्नेह असेल तर? युद्धाच्या मैदानात आल्यावर भीष्म, द्रोण इत्यादींना बघून अर्जुनाच्या डोक्यात स्नेह उभा राहिला. मी भीष्म, द्रोणांना कसा काय मारू? असा स्नेह उभा राहिला पण गीतेने त्याला स्नेह मानले नाही. वास्तविक ही चांगली विचारधारा आहे की एवढ्या सगळ्या लोकांना मारणे चांगले नाही. त्याच्या डोक्यात स्नेह उभा राहिला. अर्जुनाच्या डोक्यात स्नेह उभा राहणे चांगले होते. पण त्या स्नेहाला मोह ठरवले आहे. स्नेह नाही म्हटले.
          विद्यार्थ्यांवर शिक्षकाचे प्रेम आहे पण प्रेमाच्या आधीन होऊन विद्यार्थ्याला परीक्षेचा पेपर आधीच दिला तर? किंवा उत्तर पत्रिका तपासताना जास्त मार्क दिले तर? त्यात विद्यार्थ्यी आणि समाज दोघांचे नुकसानच आहे. स्नेह विकासाकडे घेऊन जाणारा असला पाहिजे.

        

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.