कठडा - दैनंदिन जीवनात असलेले बंधन किंवा मर्यादा.
कठडा
जीवन हे चिंतामुक्त असले पाहिजे. जीवनात भक्तीचा कठडा असेल तर तुम्ही जीवन सुखी कराल. जीवनात भक्तीचा कठडा असला पाहिजे.
भक्तीला सामाजिक बनवा. भक्तीच्या दृष्टीतून लोकांजवळ जा तर तूष्यन्ति च रमन्ति च जीवन बनेल. माणसाने नवीन घर घेतले असेल, अजून पूर्ण तयार झाले नसेल त्यावेळेस पती-पत्नी घर बघायला जातात. बाल्कनी मध्ये जायचं आहे पण भीती वाटते कारण कठडा अजून तयार झाला नाही. बिल्डर आपल्याला बाल्कनीत घेऊन जातो आणि म्हणतो, 'पहा, निसर्ग किती सुंदर दिसत आहे!' कठडा नसल्याने दोघे उभे राहूनच भीत भीत बघत असतात. पण त्यात आनंद नाही. जर त्या ठिकाणी एखादे लाकूड किंवा बांबू बांधलेला असेल तर निर्भयतेने दोघे बाहेरील निसर्गाचा सुंदर देखावा बघू शकतात. त्यांचा अनुभव आनंद अनुभवू शकतात कारण कठडा बांधलेला आहे. अशा रीतीने जीवनात भक्ती हा कठडा आहे. तो असेल तर तुम्ही जीवनात चिंतामुक्त अनुभव आनंद अनुभवू शकता.
Comments
Post a Comment