तीर्थ - ध्यान तीर्थ
ध्यान तीर्थ
ध्यान ही मोठी गोष्ट आहे. ध्यानाने चित्त बदलते, माणूस मोठा होतो. ध्यान कशाचे करायचे? योगदर्शन शास्त्र असल्याने एकाग्रता समजावताना योगदर्शनकारानी असे म्हटले नाही की भगवंतातच चित्रएकाग्र करा. चित्तवृत्ती चा निरोध कराल तर योग होतो. ध्यानात काय काय गोष्टी येतात? ध्यानाचा जो प्रश्न आहे तो अज्ञात शक्तीच्या ध्यानासाठी आहे. एकाग्रता कठीण नाही, भगवंतात एकाग्र होणे कठीण आहे.
कुणी विचारेल तुमचा भगवंता एकाग्र व्हायचा आग्रह का? त्यांना सांगा की ज्यात चित्तएकाग्र होते त्याचे गुण चित्तात येतात. पैशातच एकाग्र झालेला माणूस जडच होतो. त्याला सगळीकडे पैसा दिसतो. स्रीचे चिंतन करणारा स्रेणच होतो. एकाग्र होताना ज्यांचे चिंतन करतो त्याचे परिणाम मनावर होत असल्याने सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तीमान स्थायुधं सशक्तीकं भगवंताच माणसाने चित्त एकाग्र केले तर त्याचा परिणाम चित्तावर होतो आणि दिवसेंदिवस चित्ताचे उन्नतीकरण होत जाते आणि माणसाचा जीवन विकास होतो.
जीवन विकास म्हणजे काय ? चित्तात अमुक गुण आले तर त्याला जीवन विकास म्हणतात. अदृश्य- शक्ती भगवंत आहे. त्याच्या आवाहन करा. चित्त एकाग्र करताना आपल्या समोर जी मूर्ती आहे ती साक्षात भगवंत आहे, दगडाची मूर्ती नाही. जगातले सर्वच गुण त्याच्यात भरलेले आहेत. अशा मूर्तीत आपण एकाग्र झालो तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दिवसेंदिवस मन उन्नत होत जाते. हा भक्तीचा शास्त्रीय सिद्धांत आहे.
ध्यान हा खरोखरच विचार करण्यासारखा विषय आहे. ज्याचे ध्यान तुम्ही करणार असाल त्यात तल्लींता निर्माण झाली पाहिजे आणि तल्लीनता निर्माण करण्यासाठी कित्येक गोष्टी आवश्यक आहेत.
तो चांगला आहे असे वाटले पाहिजे, ही पहिली गोष्ट
तोच माझा आहे असे वाटले पाहिजे, ही दुसरी गोष्ट
तोच खरा आहे असे वाटले पाहिजे, ही तिसरी गोष्ट
तोच सर्वस्व आहे असे वाटले पाहिजे, ही चौथी गोष्ट आहे .
असे जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत तुमची चित्तैकाग्रता होणार नाही, मग भले तुम्ही उपासना करा, प्रार्थना करा, बाकी सर्व काही करा. या जगात भगवंतासाठी पराकाष्ट्याचे प्रेम उभे राहिले पाहिजे.
पराकाष्ट्याचे प्रेम उभे करतानाच त्याच्याबरोबर ममत्वही निर्माण झाले पाहिजे. ज्यामुळे माणूस ध्येय रूप बनतो त्याला ध्यान म्हणतात. प्रेप्सा आणि जीहासेच्या बैठकीत तुम्ही ध्यान करीत असाल तर ध्यान होते खरे पण ते ध्यानतीर्थ, ध्यानयोग नाही होत. जिज्ञासा आणि चिकीर्षेच्या बैठकीवर जर तुम्ही उपासना करू लागाल त्यावेळेस जे ध्यान होईल त्याला ध्यानयोग म्हणतात, ध्यान तीर्थ म्हणतात.
Comments
Post a Comment