प्रेमाचा सम्राट - श्रीकृष्ण

प्रेमाचा सम्राट 

              लोकांच्या हृदयात स्थान मिळते त्याला यश म्हणतात. कृष्णाला प्रेमाचा सम्राट म्हणतात. त्याला लोक हृदयाचा सम्राट म्हणतात. रामाला पण लोकोत्तर प्रेम मिळाले आहे पण रामाला प्रेमाचा सम्राट म्हणत नाहीत. रामाला लोकांनी खूप प्रेम दिले यात शंका नाही. रामाने लोकांना जपले आहे. लोकांचे मन सांभाळले आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे‌. कृष्ण स्वतःच्या विचारसरणीनुसार धावत राहिलेला दिसतो. कोणाला काय वाटेल याचा विचार त्यांनी कधी केला नाही‌. कृष्णाचे जीवन तलवारीच्या दुहेरी धारे सारखे आहे. एखादी रुढी मोडली तर लोक माझ्याबद्दल काय बोलतील? असा विचार त्याने कधी केला नाही. मी खोट्या रुढी तोडल्या, म्हणून लोक मला अनैतिक म्हणतील तर? असे कृष्णाने पर्वा केली नाही‌. लोकांना काय वाटेल ते कृष्णाने कधी पाहिले नाही, त्याला जे योग्य वाटले तो ते करत गेला. तरीही लोक त्याला प्रेम देत गेले. लोक कृष्णाच्या प्रेमाने वेडे झाले आहेत म्हणून कृष्णाला प्रेमाचा सम्राट म्हणतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.