न एकाकी रमते जिवन

 न एकाकी रमते |
         समाजातून पैसा कमवायचा आहे. पैसा काय झाडाला लागतो? म्हणून समाज पाहिजे. दुकानदाराला गिऱ्हाईक पाहिजे. जिथे वस्ती नसेल तिथे दुकान कसे चालेल? समाजातून पैसा कमवायचा आहे पण समाजापासून पैसा वाचवायचा आहे. समाजाच्या जाळ्यात मला अडकायचं नाही अशी स्थिती आहे. हे आजचे जीवन आहे. जीवनाच्या बाबतीत विचार केला तर पुष्कळ विचार करण्यासारखे आहे. लोकांनी स्मृति कशासाठी लिहिली? त्याच्या मागे काही विचारधारा असेल की नाही? आज डोक्यात काही आले म्हणून सोडून दिले. की फार मोठी समस्या आहे. माझ्या शेजाऱ्याशिवाय चालत नाही. परंतु शेजारी माझ्यापासून दूर राहिला पाहिजे. जेव्हा मला जरूर असेल तेव्हाच माझ्याकडे यायला पाहिजे. जसा काय तो माझा गुलामच नव्हे काय?
          उपनिषदांनी एक समस्या उभी केली आहे न एकाकी रमते |मी एकटा राहू शकत नाही, मला दुसरा पाहिजे. खेळण्यासाठी पण दुसरा पाहिजे‌. पुष्कळ वेळा दुसऱ्यासाठी सुद्धा आपल्याला खेळावे लागते. आम्हाला ब्रिज खेळायचा आहे. आम्ही तिघे आहोत, आम्हाला चौथा पाहिजे. चौथी आला तर खेळता येईल. अशा प्रकारे दुसरा तर पाहिजेच पाहिजे. कारण एकटे राहू शकत नाही. ठीक आहे, मग दुसऱ्याला बोलवा. दुसऱ्याला बोलावले तर? दुसरा आला तर भय निर्माण होते.
           दुसऱ्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर दुसरा आला तर भीती निर्माण होते. मग काय करायचे? काही लोक त्याच्यासाठी म्हणतात, स्नेह वाढवला पाहिजे, मैत्री केली पाहिजे. परंतु स्नेह किंवा मैत्री कोणासोबत करायची? कोणाशी मैत्री हवी? सत्कार्याबद्दल ज्याला आवड असेल त्याच्याशी मैत्री वाढवली पाहिजे. कोणी म्हणेल, यात पण तुमचे सत्कार्ये आले. मैत्री आणि सत्कार्याचा काय संबंध? सत्कार्याने व्यक्ती उभी राहते. मला पुढे जायचं आहे. एवढ्यासाठी मैत्री पाहिजे. उभे राहायचं आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून सत्कार्यात मैत्री असेल तर उभा राहील आणि सत्कार्य करून पुढे जाऊ शकेन. आम्हाला उभे राहायचे आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखी मैत्री असली पाहिजे. दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री तेवढीच दृढ आहे. परंतु ती मैत्री खड्ड्यात घालते आणि समाजाला सुद्धा खड्ड्यात घालते. कारण कर्ण स्वार्थी दुर्योधनाबरोबर, पांडवाशी वैर भावाने प्रेरित होऊन मित्र झाला होता. 


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन