इंद्र पूजा बंद करून गोवर्धन पूजा करण्याची नवी रुढी आणण्याचा श्रीकृष्णाचा प्रयत्न.

मोठा लीडर...नन
     श्रीकृष्णाने म्हटले,  'आजपासून इंद्र पूजा बंद, आता गोवर्धन पूजा करायची' रुढी तोडली. त्याबाबतीत त्याने कोणाचे मानले नाही. कृष्णाने असा Uविचार केला नाही की गोकुळच्या लोकांना काय वाटेल?
     दहा दहा पिड्यापासून इंद्रपूजा चालत आली आहे असे हजारो लोक एकत्र गोळा झाले आहेत, आणि त्यांच्यासमोर कृष्णाने एक भाषण दिले आहे. कुणाला ठाऊक काय झाले? पण रूढीप्रमाणे चालणाऱ्या म्हाताऱ्या लोकांनी पण चटकन रूढी तोडून टाकली. इंद्रपूजा सोडून गोवर्धन पूजा सुरू केली! आज कितीही आवडत्या व्यक्तीने येऊन तुम्हाला सांगितले की दहा पिढ्यापासून चालत आलेला तुमचा व्यवहार बंद करा तर तुम्ही बंद कराल? तो वाटेल तेवढा मोठा लीडर असेल, त्याला कितीतरी मान मिळत असेल, लाखोच्या संख्येत त्याला लोक बघायला किंवा ऐकायला जात असतील. पण तो जर रूढी तोडण्याबाबत एखादी गोष्ट सांगू लागला तर लोक त्याचे ऐकणार नाहीत. क‌ष्णाने फक्त एक भाषण देवून ते काम करून दाखवले आहे. त्या वेळेचे गोकुळचे मोठमोठे शिकलेले लोक कृष्णा सारख्या नवीन रक्ताच्या मुलाचे भाषण ऐकून त्याच्यासमोर नमून पिढ्यानपिढ्या चालत आलेली रुढी तोडायला तयार झाले याचा अर्थ त्या लोकांच्या मनावर कृष्णाने केवढा विजय मिळवला असेल! याच घटनेने कंस घाबरला आहे आणि त्याला मारून टाकण्याचे षडयंत्र त्याने रचले आहे. 


Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.