सर्वव्यापी भगवंत - सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे
![]() |
| मेरा बाबा |
सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे
सर्वत्र प्रभू दर्शन पहाणे हाच केवलाद्वैताचा सिद्धांत आहे. चराचरात प्रभुच भरलेला आहे. माझ्यात भगवंत आहे ही पहिली गोष्ट स्थिर झाल्यावर, मानव उत्तरोत्तर विकासाच्या मार्गाने वर वरच जाईल. तो दुर्गुणा बरोबर लढू शकेल, सदगुणांना उचलण्याचा प्रयत्न करेल. जसा माझ्यात राम आहे तसाच दुसऱ्यातही राम आहे, ही समज आल्यावर खरी नीती प्रस्थापित होईल. नीतीच्या मुळात भक्ती असली पाहिजे, उपयुक्तता नाही. उपयुक्ततेवर आधारित नीती असेल तर तिचा पाया कच्चा आहे असे समजून चला. प्रत्येक व्यक्तीत राम जागृत केला तर जीवन वेगळेच बनवून जाईल. दुसऱ्या व्यक्तीशी सबंध बांधण्यासाठी रामाचा सबंध उचलला तर संबंध पक्का बांधला जाईल. एवढ्यासाठीच आपले लोक म्हणतात की कलियुगात कीर्तन - रामकीर्तन करा. पण लोक असे समजले की हातात माळा घेऊन राम राम जपा. वास्तविक त्याचा अर्थ असा आहे की व्यक्ती - व्यक्तीत राम घेऊन जा, व्यक्ती - व्यक्तिच्या संबंधात राम घेऊन जा.
जशी मनूष्य सृष्टी आहे तशी पशु सृष्टी पण आहे. तिच्यामध्ये सुद्धा भगवंत पाहण्याचा प्रयत्न करा. पशुसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून गायीकडे पहा, तिच्यात भगवंताचे दर्शन करवण्याची श्रुतीकारांची इच्छा होती. तशीच वृक्ष वनस्पतीत सुद्धा भगवंत बघण्याची दृष्टी यायला हवी.

Comments
Post a Comment