वेदत्रैयी
वेदत्रैयी
वेदत्रैयी माणसाला दैवी, उच्च आणि सुखी बनवते. आज माणसाकडे सुख, दैवी जीवन, तेजस्विता, आनंद नसेल तर त्यांचे एकमेव कारण वेदांची उपेक्षा. दोनशे पाचशे वर्ष नाही तर दहा दहा हजार वर्षांपासून या भारत देशातल्या लोकांनी वेदांची उपेक्षा केली आहे! वेदांची हत्या ही ब्रह्म हत्या आहे. हे फार मोठे पाप आहे. ते जाणून बुजून केले आहे असे मी म्हणत नाही, अजाणताही केले असेल. ऋग्वेदात कित्येक सुंदर वर्णाने आहेत. सूर्योदय- सूर्यास्तकालीन वर्णन, उषाकाळाचे वर्णन फार सुंदर आहे. आजचे साहित्यिक ही वेदांतील ते वर्णन वाचून उडवून दिला. ऋग्वेद , यजुर्वेद आणि सामवेद मानवी जीवनात आले पाहिजेत.
रावणाशी रामाचा विरोध एवढ्या साठीच होता की रावणाने वेदांची उपेक्षा केली होती. रावणाने वेदांना स्वर दिले आहेत, वेदांचे रक्षण केले आहे. पण त्याचा वेदांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा होता की वेदांमध्ये काही थोडे बहुत चांगले लिहिले आहे ते साहित्याच्या दृष्टीने चांगले आहे, पण हा काही माझा जीवन विकास करणारा महान ग्रंथ नाही.
ज्याला स्वतःचे राज्य टिकवता आले नाही अशा रावणाने बालिश चर्चा करून हजारो वर्षापर्यंत मानव जातीला मार्गदर्शन करण्याची हिम्मत असलेल्या वेदांची किंमत कमी करून टाकली.
रावणाच्या लंकेतल्या युनिव्हर्सिटीत वेदांसाठी एक स्वतंत्र फकल्टी सुद्धा असेल पण वेदांतबाबत गौरवाचे आणि पूज्यत्वाचे स्थान त्यांनी राहू दिले नाही. ज्या ठिकाणी त्याची बुद्धी पोहोचली नाही, त्या ठिकाणी बालिश चर्चा करून वेदांचा गौरव संपून टाकला. म्हणून रावण भयंकर आहे.
रामाने लक्ष्मणाला विचारले की रावणाने तुझ्या वहिनीला परत पाठवले तर रावणाची लढायचं काय कारण? रावण पण भगवंताचा पुत्र आहे त्याला नाचायचे असेल तितके दिवस नाचू दे. असे विचारून राम लक्ष्मणाची परीक्षा घेत होता. त्यावेळी डोळे लाल करून लक्ष्मण म्हणतो, त्याला माझी वहिनी परत द्यावीच लागेल पण त्याचा मोठ्यातला मोठा गुन्हा हा आहे की त्याने वेदत्रैयीची उपेक्षा केली आहे.
जीवनातून वेद गेले की जीवनाचा आनंदही जातो, जीवणाचे सौंदर्य जाते. श्रावण महिन्यात जाणवे बदलण्याचा दिवस आहे, वेदांच्या पाया पडण्याचा, नमस्कार करण्याचा दिवस आहे.
वेदांवर भरपूर आघात झाले तरी वेद ठिकले आहेत. या तिन्ही वेदांचे काही नवनीत असेल तर ते म्हणजे ब्रह्म.
Comments
Post a Comment