तीर्थ - लज्जातीर्थ

लज्जातीर्थ 
         माणसाला दुष्कृत्यांची लाज वाटली पाहिजे, ते लज्जातीर्थ आहे. माणसाला असे वाटले पाहिजे की माझ्यासारख्या कडून हलके काम होऊ नये!ll जीवनात दुष्कृत्यांची लाज आहे, तसेच माणसाला क्षुद्र विचारांची लाज वाटली पाहिजे. आपण गीता वाचतो किंवा गीतेचे पारायण करतो त्यावेळी भगवंत माझ्यात बसला आहे ही गोष्ट जाऊ द्या पण भगवंत माझे जीवन चालवतो एवढी गोष्ट तरी ध्यानात येते की नाही? मी बघत नाही, मी कमी ब्ब चालत नाही, मी बसत नाही या सर्व कृती करणारा दुसरा आहे. त्याचा मी आहे आणि तरी माझे विचार असे? त्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे.
    आपण बोलतो की भगवंत सर्वत्र आहे, नदीत आहे, समुद्रात आहे, पर्वतात आहे, सर्वच ठिकाणी आहे. सर्वत्र भगवंत असेल तर माझ्यात कसा नसेल? माणसाला सर्वांच्यात भगवंत आहे ही समज आली आहे तरी तो रडतो आहे. सर्वांच्यात भगवंत असेल तर मला सोडून भगवंत असा राहील? स्वतःमध्ये सुद्धा भगवंत आहे याचा विचारच माणूस करत नाही. म्हणून तो उगाच रडतो आहे. त्याला फक्त एवढेच सांगायचे की सर्वांच्याच भगवंत आहे तर स्वतःपासूनच सुरुवात कर. हे त्याला दाखवायचा आहे. भगवंत माझ्यात आहे, माझा आहे, माझ्यासोबत आहे. अशी समज निर्माण झाली तर सुखप्रवाहापेक्षा प्रेमप्रवाह समजणे सोपे जाईल. भगवंताच्या सामीप्याची समज निर्माण झाली पाहिजे. या समजुतीचे तीर्थ ध्यानात आले पाहिजे. 
  सर्व तीर्थ विद्यातीर्थ, सत्यतीर्थ, गंगातीर्थ, ज्ञानतीर्थ, धारातीर्थ, दानतीर्थ आणि लज्जातीर्थ या सप्तकुंडात ज्याने स्नान केले त्यांचे जीवन कसे होते?
       विद्यार्थीर्था ने माणूस प्रभावी विचारवान होतो.
       सत्यतीर्था ने माणूस केवळ व्यावहारिक प्रमाणीकच नाही तर अध्यात्मिक दृष्ट्या प्रमाणीक होतो.  
       गंगातीर्था ने माणूस प्रेम प्रवाहाला ओळखणारा आणि त्याचा अनुभव घेणारा होतो.
       ध्यानतीर्था ने माणूस भगवंतासाठी ध्यानपरायण होतो.
       धारातीर्था ने माणूस सुख-दुःख, आपत्ती-विपत्ती विरुद्ध लढणारा होतो.
      दानतीर्था ने माणूस स्वतः खलास होईल अशा रीतीने सर्व देऊन टाकतो.
      लज्जातीर्था ने दैवी लज्जा, मधुर लज्जेची अनुभूती घेणारा होतो.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

मनुष्य गौरव दिन