वक्त्याची भूमिका - स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे
वक्त्याची भूमिका
स्वाध्याय म्हणजे स्वतःचे प्रतिबिंब बघण्यासाठी दैवी ग्रंथाचे वाचन आणि त्यासाठी तपस्वीची भूमिका असणे आवश्यक आहे.
स्वाध्याय करणे आणि कथा कीर्तन ऐकण्यात फरक आहे. लहानपणी कथा ऐकल्याने माणूस कार्यासाठी उद्युक्त होत असेल म्हणजे तत्पर होत असेल पण भक्ती क्षेत्रात नारदाने लिहिले आहे तसे न ते राजपरितोषात् क्षुधा शान्तिर्वा || नारद म्हणतात की केवळ ऐकल्याने किंवा क्षुधाशांति होत नाही. ध्रुवाची गोष्ट ऐकल्याने ध्रुवपद नाही मिळत किंवा सुदाम्याच्या गोष्टी ऐकून सुदामपुरी नाही मिळत. म्हणून स्वाध्याय हा कथा, अख्यान, व्याख्यान यापेक्षा वेगळाच आहे.
कथा किंवा अख्यान श्रोत्यांना रोचक वाटतात, चांगले वाटतात. त्यांना आवडतील अशा एक दोन गोष्टी वक्त्याने सांगितल्या की आबालवृद्ध सर्व आकर्षित होतात. पण त्यात वक्त्याची भूमिका श्रोत्यांना संतुष्ट करण्याची असते. कारण श्रोते संतुष्ट होण्यावर, खुश होऊन जाण्यावर त्याची जीविका आधारित असते.
व्याख्यानात वक्त्याला स्वतःची विद्वत्ता दाखवायची असते. म्हणून तो वेगवेगळ्या ग्रंथातील अवतरणे त्यात मांडतो. याज्ञावल्क्यानी असे सांगितले आहे आणि पतंजलीने तसे सांगितले आहे..... रामायणात असे लिहिले आहे..... वल्लभाचार्यांचे असे मत आहे आणि आद्य शंकराचार्यांचे अमुक मत आहे. सॉक्रेटिस असे म्हणतो, प्लेटो असे म्हणतो, अरीस्टॉटलने असे म्हटले आहे... इत्यादी उदाहरणे देतो. एकाच लेखावर पाच पंचवीस मते सांगून टाकायची. अशा तऱ्हेने स्वतः गोळा केलेल्या गोष्टी नीट मांडून स्वतःच्या आणि स्वतः किती सखोल अभ्यास केला आहे याचे प्रदर्शन केले जाते.
कथेत वक्ता श्रोत्यांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि व्याख्यानात समोरच्यांना शिकवायला बसल्याप्रमाणे स्वतःच्या विद्वातेने दीलखूश करून टाकत असतो.
कथेमध्ये वक्ता-श्रोत्यांचे ऐक्य होत नाही. कारण वक्त्याची भूमिका श्रोत्यांना खुश करण्याची, संतुष्ट करण्याची असते आणि श्रोत्यांना देखील दोन घटका संसाराची माया दूर सारून चांगल्या गोष्टी ऐकण्याचा आनंद मिळवायचा असतो. दोघांचेही हेतूच वेगळे आहेत तिथे ऐक्य कुठून संभावणार?
व्याख्यानातही वक्ता आणि श्रोता यांचे हेतू वेगवेगळ्या असतात. वक्त्याला वाटते की आपण विद्वान आणि शिकलेले आहोत. पाच पंचवीस ग्रंथ वाचले आहेत आणि श्रोत्यांना आपण शिकवायचे आहे. कारण श्रोत्याकडे विद्वत्ता नाही.
Comments
Post a Comment