अव्यक्त धाम - स्वतःच्या घराची ओढ असावी

परमधाम 

स्वतःच्या घराची ओढ

        एक गोष्ट निश्चित आहे की आपण असत् मधून आलेलो नाही, तर सत् मधून आलो आहोत. आपण 'होतो' आणि पुढे 'राहणार' या दोन गोष्टी नक्की झाल्या की मग मला दुसऱ्या कोणत्या ठिकाणी जायचं आहे याचा पण माणसाने विचार केला पाहिजे. म्हणजेच पर लोकांचा विचार केला पाहिजे. परलोकांची गोष्ट करून आपलेन शास्त्रकार आपल्याला सांगतात की परका लोक समजू नकोस‌. परलोक म्हणजे ईश्वराचा लोक. परलोक म्हणजे निजधाम. व्यवहारातही कोणी मरण पावला की आपण म्हणतो आमका निजधामाला गेला; म्हणजे तो स्वतःच्या घरी गेला.

        दुसऱ्या लोकात जायचं आहे तर त्याला पर लोक समजू नका, स्वतःचे घर समजा असे आपले शास्त्रकार सांगतात. तुम्ही त्याला स्वतःचे घर समजला तर तुम्हाला परकेपणा वाटणार नाही. परलोक हे माझे घर आहे. म्हणून माणसाला परलोक जाण्याची ओढ असली पाहिजे. संध्याकाळ झाली की प्रत्येक माणसाला स्वतःच्या घरी जाण्याची ओढ असते. आपण इतके अज्ञानात आहोत की आपल्याला तशी उत्कंठा वाटत नाही. याचा अर्थ माणसाने मरण्याची इच्छा करावी असे नाही, पण स्वतःच्या घराची ओढ प्रत्येकाला असावी.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन