शास्त्रीय मूर्तीपूजा कशासाठी असावी ?

शास्त्रीय मूर्तीपूजा 
             कुणी विचारल तुमचा भगवंतात एकाग्र व्हायचा आग्रह का? त्यांना सांगा की ज्यात चित्तएकाग्र होते त्याचे गुण चित्तात येतात. पैशातच एकाग्र झालेला माणूस जडच होतो. त्याला सगळीकडे पैसाच दिसतो. बाप मेला तरी खर्च किती होईल असेच विचारणार. स्त्रीचे चिंतन करणारा स्रेणच होतो. एकाग्र होताना ज्याचे चिंतन करतो त्याचे परिणाम मनावर होत असल्याने सर्व गुणसंपन्न सर्व शक्तिमान सायुधं सशक्तीकं भगवंतात माणसाने चित्त एकाग्र केले तर त्याचा परिणाम चित्तावर होतो आणि दिवसेंदिवस चित्ताचे उन्नती करण होत जाते आणि माणसाचा जीवन विकास होतो.
           जीवन विकास म्हणजे काय? आपले शरीर फुगले तर डॉक्टर म्हणतात कमी खा. ह्रदय मोठे झाले तरी तो रोग म्हणतात. मग जीवन विकास म्हणजे काय? चितात अमुक गुण आले तर त्याला जीवन विकास म्हणतात. 
         अदृश्य शक्ती-भगवंत आहे त्याचे आवाहन करा. चित्तएकाग्र करताना आपल्या समोर जी मूर्ती आहे ते साक्षात भगवंत आहे, दगडाची मूर्ती नाही. जगातले सर्वच गुण त्याच्यात भरलेले आहेत.
       अशा मूर्तीत आपण एकाग्र झालो तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे दिवसेंदिवस मन उन्नत होत जाते. हा भक्तीचा शास्त्रीय सिद्धांत आहे.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन