स्वाध्याय - गीतेला समाजापर्यंत पोहोचवण्याचे एक मार्ग.
स्वाध्याय ज्या लोकांनी कठोर व्रत म्हणून स्वाध्याय व्रत घेतले आहे त्यांच्यासमोर मी स्वाध्याय बद्दल काय बोलू? आपण रात्रंदिवस स्वाध्याय करीत आहोत. स्वाध्याय एक जीवन दीक्षा आहे, एक जीवनदर्शन आहे. स्वाध्याय म्हणजे केवळ कथा कीर्तन ऐकणे नाही. कथा आणि स्वाध्याय यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. टांगेवाल्याचा घोडा आणि भागवान इंद्राचा उच्चै:श्रवस अश्व त्यांच्यात जेवढा फरक असेल तेवढाच फरक स्वाध्याय आणि कथा कीर्तन यांच्यात आहे. स्वाध्याय निराळा आणि कथा कीर्तन निराळे. स्वाध्यायात एक निराळी दृष्टी आहे. स्वाध्याय करणाऱ्यांचे आणि करवणाऱ्याचें वर्तन निराळे असते. केवळ पुस्तक वाचणे म्हणजे स्वाध्याय नाही. स्वाध्याय करण्यासाठी माध्यम तर पाहिजे. माध्यम म्हणून स्वाध्यायात कोणते पुस्तक घ्याल? स्वाध्यायात भेजा बदलायचा आहे, डोके बदलायचे आहे त्यासाठी पुस्तक किंवा ग्रंथ पाहिजे. तुम्ही सध्या कोणता ग्रंथ घ्याल? आपल्या जीवनात प्राण भरणारा, जीवन निष्ठा उभी करणारा, मृत्युंजय वृत्ती उभी करणारा, जीवनात तेज भरणारा असा ग्रंथ ह...