प्रत्येक मानवाच्या कर्माचा कर्मयोग.

      
कर्मयोग्यांचा कर्मयोग 
      व्यक्तीला भौतिक जीवनासाठी आणि अध्यात्मिक जीवनासाठी तयार करावे लागेल. त्याखेरीज तो साधना करू शकणार नाही. कुणी गुरु मला भगवंतापर्यंत घेऊन जाईल असे मानण्यात लाचारी आहे. आज ईश्वरवादी कमी नाहीत पण ते कोमेजून गेले आहेत. 'मी ईश्वराला नमस्कार करतो' असं सांगण्यात माणसाला शरम वाटते. उपनिषद ऐकायला जातोय असे सांगण्यात काय हरकत आहे? यावर तो म्हणतो विचारणारे लायन्स क्लबचे मेंबर आहेत. लायन्स क्लब चे लोक काय आकाशातून आले आहेत? पण त्यांच्यासमोर उपनिषद नाव घ्यायला तो घाबरतो. मी भगवंताला नमस्कार करतो त्यात तुझे काय जाते? असे सांगण्याची ईश्वरवाद्यांत हिम्मतच नाही, असा जमाना आला आहे. निरेश्वरवादी ईश्वराला आव्हान देतात आणि ईश्वरवादी म्लान झाले आहेत, कोमेजून गेले आहेत त्यांच्यात चैतन्य निर्माण करावे लागेल.
         धर्म आणि भक्ती मधून चैतन्य निघून गेले आहे. त्यांच्यात चैतन्य राहिलेच नाही. व्यक्तीला उभे करण्याची त्यांच्यात ताकदच नाही. ते कर्मकांडी आहेत. धर्म आणि भक्तीवर कचरा साचला आहे. हा कचरा काढला नाही, तर तुम्ही धार्मिक आणि भक्त कसे गणले जाणार? हे काम केले नाही तर कसे चालेल?

Good or bad, what you put out comes back to you.
चांगल की वाईट, जे तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल तेच तुम्हाला वापस येत.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन