सतयुगाचा राजा श्री कृष्ण

 




कृष्ण

      आम्ही कृष्ण पूजाक आहोत. कृष्णाचा अर्थ काय आहे, माहित आहे? काळा. जिथे जिथे काळेपणा असेल त्याची आम्ही पूजा करतो. कुठलीही व्यक्ती आली की तिच्यात चांगले काय आहे ते आम्ही बघणार नाही. आम्ही वाईट काय हेच बघणार. माणसाने दोषज्ञ असावे तसे गुणज्ञ पण असले पाहिजे. स्वतःची कृती, स्वतःचे जीवन, स्वतःचे भोग यांचे कठोर आत्मनिरीक्षण करण्याची  ज्याने सवय नाही लावली, अशी व्यक्ती ज्याने विकसित नाही केली तो अध्यात्मिक कसा असेल? म्हणून आत्मनिरीक्षण असले पाहिजे.

         ज्याला कधीच स्वतःची चूक पहायची इच्छा होत नाही तो आध्यात्मिक कसा होऊ शकेल? अध्यात्म ही आतली समाज आहे. म्हणून स्वतःच्या बुद्धीत चिकित्सा करण्याची शक्ती पडून आहे ती वाढवली पाहिजे, विकसित केली पाहिजे. त्यामुळे काय होईल? सत्कृती वाढेल. असत् कृती असली तर पुन्हा होणार नाही. म्हणून आत्मनिरीक्षण ही पहिली गोष्ट आहे.

          बुद्धीत दुसरी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे अमृत स्वरूपात विचार करण्याची शक्ती. तिला म्हणतात, सुजनात्मक चिंतन. या शक्तीने जसा आर्किटेक्ट डिझाईन तयार करतो, तसे आपण मनोरंजन करीत असतो. माणूस बसल्या बसल्या असा विचार करतो की आपले घर असे असे असेल. माणसाला विचार करण्याची शक्ती भगवंताने दिली आहे. जसा माणूस स्वतःच्या घराचा विचार करतो तसा देवाच्या घराचा पण विचार करतो. ते असे असेल, असा समाज असेल. वास्तविक ज्यांचे अमृर्त चिंतन भव्य असेल, दिव्या असेल , तेवढी त्यांच्या आतील शक्ती विकसित होत जाईल. दिव्य अमृत चिंतन करून बुद्धीशक्तीला विकसित केले पाहिजे.

        आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. ते तुटक अनुभव एकत्र करण्याची शक्ती आपल्या बुद्धीत आहे. त्यालाच मनन म्हणतात. ती शक्ती वाढवली पाहिजे. सकाळी भक्ती करायला बसतात तेव्हा विखुरलेले अनुभव एकत्र करा. दहा वर्षांपूर्वी कुठल्या परिस्थितीत सापडलं होतो! त्यावेळेस मला भगवंताने मदत केली आणि मी उभा राहू शकलो. त्याप्रसंगी मी कशा संकटात सापडलो होतो! मी अगदी आकुळ-व्याकुळ झालो होतो. एवढ्यात अवचित एक माणूस माझ्या मदतीला आला .त्याला कोणी पाठवले होते? भगवंताने पाठवले होते. असा भाव प्रधान अनुभव पुन्हा पुन्हा आठवला पाहिजे, जेव्हा तो प्रसंग घडला असेल त्या काळात गेले पाहिजे. तो विचार करण्यासारखा प्रसंग असेल तोच लक्षात राहील, नसेल तो विसरला जाणार. स्वतःचे अनुभव आणि विचारांसोबत दुसऱ्याचे अनुभव व विचारांचे देखील चिंतन केले पाहिजे. त्यातून एक शक्ती निर्माण होत. भारतीयांनी जसे तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्वीकारले आहे तसेच कथांचेही महत्व स्वीकारले आहेत.

       म्हणून कथांची किंमत वाढवली आहे. या दृष्टीने वेगवेगळे अनुभव एकत्रित केले पाहिजेत. त्यालाच मनन म्हणतात. अध्यात्मात मनन आवश्यक आहे. त्याशिवाय बुद्धी खुलत नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन