समाज एकत्र टिकावून ठेवण्यासाठी ऋषींचे प्रयत्न.
ऋषींचे प्रयत्न
तीस वर्षांपूर्वीच्या समाजात आणि आजच्या समाजात जबरदस्त फरक पडला आहे. विचारांमध्ये फरक पडला आहे. परंतु हा फरक चांगला आहे की वाईट आहे ते माहित नाही. आजची सामाजिक स्थिती पाहून अस्वस्थ होतात. ते आजची सामाजिक स्थिती, विचार पाहू शकत नाहीत, आज जो फरक होत चालला आहे तो अपेक्षित आहे की नाही?
आपले ऋषी आत्मसाधना, आत्मज्ञान, समाधीत दंग राहू शकत होते. त्यांना कशाची गरज होती? आद्य शंकराचार्य किंवा वल्लभाचार्य बाहेर कशासाठी पडले? त्यांना भक्ती करायची होती तर त्यांनी समाधी लावायची ,भगवंतापाशी बसायचे. त्यांना सर्व ठिकाणी फिरण्याची काय गरज होती? भगवंतामध्ये तल्लीन होऊन बसून राहण्यात काय हरकत होती? तहान भूकही विसरून जायचे असे त्यांची भक्ती होती. परंतु समाज परिवर्तन व्हावे, समाज सन्मार्गाने चालावा असे काम ते करत होते. त्यांनी लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न कशासाठी केले? प्रत्येकाच्या शरीरात भगवान बसला आहे, तो अस्वस्थ व्हावा असे जीवन जे लोक जगतात त्यांचे जीवन सुधारले तर भगवंताचे अस्वस्थता कमी होईल. भगवंतावरील प्रेमामुळे ते लोकांमध्ये जात होते. असे जीवन आणि विचार भगवंताला सुंदर वाटतात.
Comments
Post a Comment