सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 3. निसर्गाचे अनुकरण करणारी कोणतीही गोष्ट सुंदर असते.
3. Anything is beautiful which is an immitation of nature.
निसर्ग आत्मारात आहे. जीवन निसर्गासारखे हिरवेगार वाटले पाहिजे. इंग्रजीत ज्याला evergreen म्हणतात तसे. संपत्ती किंवा विपत्ती ज्याचे जीवन बदलू शकत नाही, त्यांचे जीवन हिरवेगार आहे असे म्हणतात.
जीवन आत्मरत असले पाहिजे. झरा किंवा झाडाला काही मिळाले नाही तरी निराश होत नाही. आपण नाटक बघायला गेलो आणि तिकीट नाही मिळाले की नाराज होतो. चेहऱ्यावरून आपली स्थिती कळते.
आपले सर्व सद्गुण दाखवण्यासाठी असतात. आपण भगवंताची पूजा देखील दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो. सकाळी साडेसात वाजता कोणाची अपॉइंटमेंट असेल तर सात पंचविसला पूजा करायला बसतो. येणाऱ्याला कळले पाहिजे की मी पूजा करायला बसलो आहे. मी पुजारी आहे.
आपले सौंदर्य देखील दुसऱ्याला दाखवण्यासाठी असते. एक दिवस बादशहा अत्तर लावत होता. बाटली कलंडली आणि आत्तराचा एक थेंब खाली सांडला. बादशहाने खाली पडलेले अत्तर टिपून घेतले, वाया जाऊ नये म्हणून. त्याचवेळी बिरबलाने ते पाहिले. बादशहाच्या ते लक्षात आले. बादशहाला वाटले की माझी कंजूशी बिरबलला कळली. त्याने विचार केला की माझे औदार्य बिरबलाला कळले पाहिजे. दुसऱ्या दिवशी बादशहानी एक हौद अत्तराने भरून ठेवला. आणि जाहीर केले की ज्याला हवे त्याने त्यातून अत्तर घेऊन जावे. लोक अत्तरासाठी लाईन लावून उभे राहिले. बादशाहाने बिरबलाला म्हटले बिरबल बघ आजकाल अत्तर फार महाग झाले आहे. गरीब लोक असे अत्तर कोठून आणतील? म्हणून त्यांच्यासाठी अत्तराच्या भांडार खुले केले आहे. हवे त्याने घेऊन जावे. बिरबल म्हणाला जहापनाह बुंदसे गई वो हौदसे नही आती. तुमचे औदार्य दाखवण्यासाठी आहे. जे पिंडगत नाही, जे दिखाऊ आहे ते उपयोगी नाही.
जसा निसर्ग हिरवागार आहे तसे ज्याचे जीवन हिरवेगार बनले आहे तो सुंदर आहे. निसर्ग जसा आत्मारत आहे तसा जो आत्मरत आहे, तो सुंदर आहे.
निसर्गाकडे प्रसाद आणि प्रसन्नता आहेच, पण निसर्गापाशी जो जातो तो स्वतः प्रसन्न होऊन जातो. कितीही मानसिक आणि शारीरिक रित्या थकलेलो असलो तरी आपण निसर्गापाशी जाऊन बसताच सर्व थकवा नाहीसा होतो. निसर्ग प्रसन्न आहे आणि आपल्यालाही प्रसन्न बनवतो. निसर्ग प्रवचन नाही देत, व्याख्यान नाही देत, निसर्गाला केवळ बघूनच प्रसन्नता येते. आता आपण येथे बसला आहोत. किती हिरवेगार सौंदर्य दऱ्याखोऱ्यामध्ये भरलेले आहे! तुम्ही हिमालयात गेला तर अनेक रंगीबेरंगी, सुगंधी फुले दिसतील की कोणी घेत नाहीत. त्यांना बाजारात काही किंमत नाही. कोणी तिथून फुले वेचून बाजारात विकत नाही. मुंबई वाला कोणी तिथे गेला तर म्हणेल फुले खूप सुंदर आहेत! तर त्यांना चांगले वाटते का? बघणारा कोणी आला नाही तरी ती बेफिकीर आहेत. आला तर या! त्यांना त्याचे काही पडलेले नाही. निसर्ग जसा आत्मरत आहे, तसे महापुरुष आत्मरत आहेत. त्यांच्याबद्दल किती लोक चांगले बोलतात? आपण तर वर्तमानपत्रात बघतो, आपले नाव छापून आले की नाही?
काय वाटेल ते करून आपले नाव पेपर मध्ये आले पाहिजे. महापुरुषांना असे वाटत नाही. त्यांना पाहून आपण प्रसन्न होऊन जातो. साधू संतांसाठी आपल्या देशात एक शब्द आहे- दर्शन! बघणे वेगळे आणि दर्शन वेगळे. आपण कुत्र्याला पाहतो, परंतु संताचे दर्शन घडते. त्यांना पाहतो त्यात काही वेगळेच वैशिष्ट्य वाटते. या वैशिष्ट्याची कल्पना जेव्हा येते तेव्हा आपण म्हणतो की याज्ञवल्क्यांचे दर्शन केले! त्यांना पाहून प्रसन्नता येते. त्यांच्यापाशी विद्वत्ता किती आहे त्यांचा उपयोग किती आहे, ते माहित नाही.
झऱ्यांचा उपयोग किती ते माहीत नाही पण झरे बघून माणूस प्रसन्न होतो. कशामुळे प्रसन्नता येते? चैतन्य सर्वत्र आहे, अणु-परमाणूत आहे. अनुयुगात जडवादाची तिरडी बांधली गेली आहे. Science Today and tomorrow मध्ये त्याचा लेखक म्हणतो की आता कोणताही विचार करायचा असेल तर आत्म्याच्या प्रांतातच विचार करावा लागेल. आता काही जड राहिलेच नाही. सर्व जागी चैतन्य आहे. झाडात चैतन्य आहे तसे आपल्या जीवनातही चैतन्य आहे की नाही.तरीही आपल्याला पाहून कोणाला प्रसन्नता येत नाही. परंतु याज्ञवल्क्यांना पाहून प्रसन्न येते. त्यांचा अहम् वासनाने बरवटलेला नाही. त्यांच्या आतं असलेल्या चैतन्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि प्रसन्न होतो. ते काही देत नाही, त्यांचा उपयोग किती आहे ते माहित नाही. झाडाचा उपयोग किती ते माहीत नाही. पण झरे बघून माणूस प्रसन्न होतो. कशामुळे ही प्रसन्नता येते? चैतन्य सर्वत्र आहे. चमत्कारही करत नाही तत्त्वज्ञान साधे असले पाहिजे. चमत्काराधीष्टीत अध्यात्म जेव्हा येते तेव्हा अध्यात्म खलास होते. भगवंताने चमत्कार केला नाही. तुझा जन्मच चमत्कार आहे. तुझे अस्तित्वच चमत्कार आहे. तू जगतो आहेस पण एक चमत्कार आहे. तुझा श्वास देखील चमत्कार आहे. ज्याचा आम ढवळलेला नाही तो सुंदर आहे. निसर्गाचा अहम् ढवळलेला नाही, आपल्यातील अहम् मात्र ढवळलेला आहे. म्हणून तो दुसऱ्याला प्रसन्नता देऊ शकत नाही. ते विशुद्ध चैतन्य नाही. असे जीवन आहे की ज्याला पाहून प्रसन्नता येईल, तीही आवश्यकते शिवाय. नाहीतर प्रियतमाला पाहून प्रियकराला प्रसन्नता येते पण ती क्षणिक असते. ती प्रियतमा मरून गेली की प्रियकराचे आकर्षण संपते. हे प्रेम नाही वास नाही, वासना आहे. ज्याच्या जवळ निसर्गासारखी प्रसन्नता आहे आणि आत्मरता आहे, त्याचे जीवन सुंदर आहे.
Comments
Post a Comment