ओंकार - प्रत्येक मंत्रात दडलेला

प्रत्येक मंत्रात दडलेला ओंकार
     

    देवाने हृदयस्त प्राणाचे उदगीथ रूपात उपासना सुरू केली.त्याच्यावर केलेले असुरांचे प्रहार निष्फळ ठरले आणि शेवटी असुरांचा नाश झाला. याप्रमाणे निस्वार्थरीत्या इंद्रियांचे रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे आणि प्रणव हे प्राणाचे प्रतीक आहे. माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी उब प्राणापासून मिळते व विश्वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने पाहता अमृतत्त्वाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे. छांदोग्य उपनिषदात एक मूलभूत दाम्पत्याची कल्पना आहे. हे दाम्पत्य वाणी व प्राणाचेच आहे. आणि दोघांचे मिलन ओंकारातच होते. वाणी व प्राणाच्या विशिष्ट सहयोगाने ओंकाराचा उच्चार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर ओंकार रूपी बालकाला जन्म देऊन वाणी व प्राणाचे दांपत्य जीवन कृतार्थ बनले‌ ब्रृहस्पतीने देखील त्याची उदगीथ रुपाने उपासना केली आहे. आणि तिचा पती म्हणजे प्राण‌. वेदांमधील तो बृहस्पती तोच पुराणातील गणपती. ओम साडेतीन अक्षराचा बनला आहे. त्यातील पहिला मात्र ओंकार आहे, दुसरी मात्र उकार आहे, तिसरी मात्र मकार आहे. आणखी अर्धी मात्रा हे सर्व मिळून असा ओंकार झालेला आहे. प्रत्येक मात्रा भिन्नभिन्न क्षेत्रातून वेगळेवेगळे सुचवते. जर सृष्टीच्या व्यापकतेचा विचार केला तर अकार हा पहिल्या मात्रेत पृथ्वी, उकारात अंतरिक्ष आणि मकारात देवलोक व्याप्त आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, व लय यांचा विचार केला तर अकार हा उत्पत्ती सूचक आहे. उकार हा स्थिती सुचक आहे ओमकार हा लयाच्या सूचक आहे. 
    जिवात्म्याच्या तीन स्थितीत विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अ कार, आणि म कार यांनी व्यक्त होतात. ओंकारात अ कारावर भर दिला तर अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्त होते. उ कारावरचा भर आधी दैवी सामर्थ्याच्या सुचक आहे. आणि तिसरी मात्रा म कारावर ध्यान केंद्रित करण्यात आले तर ब्रह्माच्या साक्षातकारात सहाय्यभूत होते. त्याच्याद्वारे जीवनाची सार्थकता साधता येते. जीवन आमृतमय बनते.
    ह्या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहे. इंद्रिंयाकडून होणारी कर्में , मनाकडून होणारी कर्में व बौद्धिक कर्मे या तिन्ही कर्माना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवतो. अर्थात मानवाने त्याचा अंतरबाह्य योग्य रीतीने विनीयोग करणे आवश्यक आहे.
     शेवटी राहिली अर्धी मात्रा. ही मागील तिनी मात्रा अ कार , उ कार व म कार यांच्या सहयोगाचे सूचक आहे. ती भूत मात्र प्रत्येकाची सहिष्णुता व सर्वव्यापी भगवंत तत्वाची सूचना देते. तेजस्वी व पाप पुण्यापासून अलिप्त अशा शांत आत्म्याचे ती प्रतीक आहे. ब्रह्मवादी लोकांच्या यज्ञ, दान , तप इत्यादी क्रिया ओंकाराचा उच्चार करूनच सुरू होतात असे भगवान अर्जुनाला सांगतात.
   वेदमंत्र ओंकार पूर्वकच उच्चारले जातात. ओंकारा शिवाय वैदिक मंत्र लंगडे गणले जातात. ओंकार पूर्वक केलेली कोणतीही कर्मे सातवीक बनतात. ओंकार हा कर्माच्या प्रारंभात अंधारात दीपक किंवा वाळवंटात वाट दाखविणाऱ्या माहिती गारासारखा आहे. आरंभलेल्या कामाला शेवटपर्यंत पोहोचविण्यात तो मदत करतो. एवढेच नाही तर कर्मात असलेले दोष देखील तो दूर करतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी ऋषींनी एक युक्ती शोधून काढली. आणि ती युक्ती आहे ओंकाराची. कर्माच्या आरंभात ओम तत् सत् म्हटल्यानंतर यज्ञ, दान इत्यादी कर्मे बाधक न बनता मोक्षदायक बनतात.
    समग्र विश्व ओंकार सामावले जाते इच्छा सिद्धी मोक्षप्राप्ती सर्वच ज्यात समाविष्ट होते अशा ओंकाराचे योगी जन सतत ध्यान करतात.
      ओंकाराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार असला पाहिजे. दृश्य किंवा श्राव्य जगाच्या विषयासाठी संपूर्ण विर्त्की निर्माण होत नाही तोपर्यंत ओंकाराची उपासना करणे हा अनधिकारी प्रयत्न आहे. ज्याने जीवनात द्वंद्वावांमध्ये संतुलन ठेवण्याचे शिक्षण घेतले आहे. ज्याची वृत्ती अनासक्त बनली आहे. वैराग्यमय बनले आहे तोच ओंकाराच्या उपासनेचा अधिकारी गणला जातो. ओंकार उच्चारण्यातील काही शारीरिक लाभ ध्यानात घेऊनही तो उपाश्य म्हणून सार्वजनिक होऊ शकत नाही. म्हणून तशा लोकांना ओंकाराचा जप करायला न सांगता- सगुण साकार भगवंताची उपासना समजावली पाहिजे. आणि म्हणूनच सामान्य लोकांत केवळ ओमचा जप न करता हरी ओम, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय वगैरेचा जप करण्याची पद्धती आहे .जुन्या काळात तर फक्त खऱ्या अर्थाने संन्याशी झालेले लोकच ओम चा जप करीत होते. 
       ओम हे अनुभूती सुचक प्रतीक आहे. ते ओंकाराचे सूचक आहे. आणि म्हणून ओम द्वारा प्राप्त होणाऱ्या उत्तरात आपल्या वृत्तीचे प्रतिबिंब पडते. तसाच आपल्या विचारांचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो. आपण जर विचारले भगवान आहे का तर ओम उत्तर देईल होय आहेच. भगवान आपल्याला भेटेल का? ओम सांगेल हा भेटेलच. भगवान भेटणे कठीण आहे का? ओम सांगेल हो कठीण आहे‌. ह्याप्रमाणे निराश झालेल्याला तो हिम्मत देतो आणि उतावीळ बनलेल्यांना साधना व तपश्चर्या यांचे महत्त्व समजावतो. ओंकार आपल्याला वेडा आशावाद व दुर्बल निराशावाद यांच्यात संतुलन ठेवायला शिकवतो‌.
        सारांश ओंकार परब्रम्हाचे प्रतीक आहे. ब्रह्मविद्याचा समग्र अर्थ ओंकारात संकलित झालेला आहे. म्हणून तीन मात्रा ने समग्र सृष्टीला सामावून घेतो. तर शेष उरलेल्या अर्धा मात्रेने सृष्टीकार्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तो असक्तीचे भरत वाक्य आहे आणि अनासक्तीची नांदी आहे. तो प्राण व परब्रम्ह यांचे तेजपुंज असे प्रतीक आहे. ओंकाराला जर त्याच्या खऱ्या अर्थात आत्मसात करून घेतले तर विश्वंभर स्वतः आपल्या हृदयांगणात येऊन खेळू लागेल. म्हणूनच खूप निश्चित आणि उद्घोष केला आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन