सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 1. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात सौंदर्याचा साधा दर्जा असतो.

 



सौंदर्याच्या पंधरा व्याख्या,

1. Anything is beautiful which possesses simple quality of beauty. 

         सौंदर्याचा गुण केवळ आकर्षकता आहे. ही प्रथम व्याख्या आहे. मन, बुद्धी, संकल्प आकर्षक आहे, ही सुंदरता आहे. भगवंताला आकर्षक वाटेल असे जीवन बनवा. ज्याला आवश्यकता नाही अशा भगवंताला आकर्षक सुंदर वाटलं पाहिजे. त्यासाठी मन, बुद्धी, संकल्प आकर्षक करा.

        सफलता, विफलता, संघर्ष या सर्वांमध्ये जीवन आकर्षक असले पाहिजे. ते ज्यामुळे मिळते तिला विद्या म्हणतात. मनुष्याची जी संघर्षवृर्ती आहे तेच जीवनाचे प्रेम आहे. आणि संघर्षकार्पण्य जीवनाची उदासीनता आहे. मला दुसरे काही उचलायचं नाही गुण उचलायचे आहेत. शरीराहून मन वेगळे आहे‌. गुण उचलण्यासाठी मनाने चांगले संकल्प केले पाहिजेत. संकल्पात सुगंध आणला पाहिजे. 

      असे सगळे बोलतात. ही एक बोलायची पद्धत, प्रथा होऊन गेली आहे. देवा सर्वांना सुखी कर ह्या संकल्पला तेव्हाच सुगंध येतो. जेव्हा संकल्पच्या मागे प्रामाणिकपणा चे मिश्रण असते.

       आपला संकल्प आकर्षक वाटला पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके. असा संकल्प असला पाहिजे. ज्याने काही केले आहे, ज्याला काही करायचे आहे, जो दिवस-रात्र त्यासाठीच घाम गाळतो आहे, रक्ताचा थेंबन थेंब ज्यांनी या कामासाठी दिला आहे. तो जो संकल्प करतो त्याला सुगंध येतो. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे. असा संकल्प केला पण त्यामागे प्रामाणिक कृती नाही. असे संकल्प तर आपण दरवर्षी ऐकतो. निवडणुकी आल्या की सर्वच नेत्यांच्या तोंडून चांगले चांगले संकल्प ऐकायला मिळतात. त्यांच्या संकल्पच्या पाठी प्रमाणीकपणा नाही. कृती नाही व त्यांच्या संकल्पना सुगंध नाही.

       भगवंताला आपला संकल्प सुंदर केव्हा वाटेल? जेव्हा त्या पाठीमागे प्रामाणिकता आणि कृती असेल तेव्हा. तरच त्यांच्या विचारांना सुगंध येईल. बुद्धीपूर्वक केलेला विचार माणसाचे भले करतो. बुद्धीला देखील चालवणारा फिरवणारा कोणी आहे. हे माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे.

        वेदांचा अर्थ आहे ज्ञान. वेदांचा अर्थ आहे विचार. म्हणून आपण वेदांचे विचार मांडले आहेत. विचार चांगले असले पाहिजे. तेजस्वी असले पाहिजेत. विचार जेव्हा खराब होतात तेव्हा व्यक्ती गलितगात्र होऊन जाते. अर्जुनाचे विचार दुबळे बनताच त्याची काय स्थिती झाली? त्याचे वर्णन गीतेच्या पहिल्या अध्यायत आहे. विचारांचा मनावर जबरदस्त परिणाम होतो. तेजस्वी, भव्य, दिव्य ऐकलेत तर विचारांचा सुगंध तुम्हाला मिळेल. कोणते विचार असले पाहिजेत. घासलेट मिळत नाही ते मिळाले पाहिजे यात वाद नाही परंतु हा प्राथमिक विचार आहे. त्यात भव्यता नाही. रस्त्यात चालणाऱ्या कोणासाठी आपण मार्गदर्शक बनले पाहिजे. विचारांमध्ये भव्यता असली पाहिजे. त्यात आत्मप्रत्य असला पाहिजे. ज्या विचारांमध्ये आत्मप्रत्य आहे आणि जे कृतीपूर्ण आहेत अशा विचारांना किंमत आहे.लोक तत्त्वज्ञानावर पुस्तके लिहितात पण त्यात आत्मप्रत्य दिसत नाही. ज्यात आत्मप्रत्यय नाही ते कामाचे नाही. विचारांना सुगंध तेव्हाच येतो जेव्हा ते भव्य बनतात. ज्यांच्या डोक्यातून विचार निघाले आहेत त्यांच्यात आत्मप्रत्यय असला पाहिजे आणि कृतीपूर्णता असली पाहिजे. केवळ आपले विचार चांगले आहेत असे बोलून चालणार नाही. ते विचार कर्मात उतरले पाहिजे. जे विचार कृतीपूर्ण बनले आहेत. भव्य आहेत. आत्मप्रत्यवान आहेत. त्यांना सुगंध आहे. आपले संकल्प, विचार सर्वांना सुगंध आसला पाहिजे. तर ते भगवंताला आकर्षक वाटते. 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन