प्रतीक दर्शन - मानवी जीवनातील काही अदृश्य गोष्टी
प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात. असंदिग्ध असतात. सारगर्भित व व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकाबद्दलही तसेच आहे. जसा एका लहानशा सूत्रात अनंत अर्थ सामावलेला असतो, एका लहानशा बी मध्ये विशाल वृक्षाचा विस्तार सामावलेला असतो तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते.
भौतिक रित्या पाहता राष्ट्रध्वज हा कपडाचा लहानसा तुकडा आहे. याचे काही विशेष मूल्य नाही परंतु सांस्कृतिक भावनेच्या दृष्टीने पाहता तो अमूल्य आहे. राष्ट्रातील कोट्यावधी जनतेच्या प्राणार्पणानेही त्याचे रक्षण केलेच पाहिजे. बांगड्या व कुंकू त्याच्यासारख्या सामान्य वस्तू जेव्हा स्त्रीच्या सौभाग्याचा विषय बनवून उभ्या राहतात त्यावेळी त्यांच्या मागे असलेली भावना ही लहानशा वस्तूचे मूल्य अनेक पटीने वाढावीते. सामान्य दगडाला शेंदूर फासताच तो दगड न राहता तो देव बनतो. त्याची पूजा होते. प्रतीक ही मौनाची भाषा आहे शांतीचे संगीत आहे. संस्कृतीच्या महिम्याचे मुख गीत आहे. प्रतीकोपासना म्हणजे बिंदूमध्ये सिंधू पाहण्याची हिंमत किंवा घागरीत सागर सामावण्याची शक्ती. प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दाच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे संकेतात शास्त्र रहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान.
प्रवृत्ती मध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या आजच्या काळातील प्रत्येक मानवाचा व्यवहार वरवरचा बनला आहे. त्याच्या हास्यात प्रसन्नता नाही की त्याच्या रुदनात अंतकरणाची खरी व्यथा नाही. त्याच्या सेवेत प्रेम नाही की त्याच्या कृती तत्परता नाही. त्याच्या अभ्यासात एकाग्रता नाही किंवा भक्तीत तल्लीनता नाही. त्याच्या संसारात अनुरक्ती नाही त्याच्या संन्यासात विरक्ती नाही. सारांश ह्याच्या जीवनाचा विस्तार वाढलेला आहे पण त्याने जीवनाची खोली गमावलेले आहे. ती खोली पुन्हा प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतिका मागे लपलेला दिव्य अर्थ समजून घेण्यासाठी शास्त्राचे सखोल अध्ययन केले पाहिजे. मन मंदिरात दिवा पेटवला पाहिजे. तसेच हृदयसागराचे मंथन करण्यासाठी अविश्रांत परिश्रम केले पाहिजेत.
प्रतीकाच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज व सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ शकते. विरक्त वृत्तीने संसारात राहून संन्यास्त जीवन जगणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे असेल तर त्यासाठी लांबलचक व्याख्यान देण्याऐवजी कमळाची आठवण केली तर जलकमलवत एवढेच बोलून आपले काम पुरे होईल. जीवनात पाळावयाच्या विविध सूचना 'उंबरठा' सहज रीतीने करून देतो. तिलक बुद्धि पूजेचा महिमा समजावतो. स्मशान घाट नश्वर जीवनाकडे आपले लक्ष खेचून घेतो. संस्कृत नाटककार स्वतःच्या नाटकाच्या सुरुवातीला मांगल्यमुलक नांदी लिहीत असत. परंतु एवढ साहित्यसाधना किंवा कविताशक्ती ज्याच्या जवळ नाही तो केवळ स्वास्तिकचे प्रतीक काढून स्वतःच्या कार्याचे शुभ किंवा मांगल्ये सहजपणे प्रकट करू शकतो. अशिक्षित माणूस देखील निशाणी पाहून मतदान करू शकतो. त्याच्यासारखे हे आहे.
ह्याप्रमाणे प्रतीकाची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर हे सांस्कृतिक संकेत आपल्या जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहित तसेच कार्य साधक बनतील. संस्कृतीची सर्वच प्रतीके आपण संपूर्ण रित्या समजलो आहोत.ही बौद्धिक बालिशता समजली जाईल. त्याची उपासना किंवा यथाशक्ती पूजा करता येते. तसेच बुद्धीची कृतज्ञता हे जीवनाचे किंचित साफल्य समजता येईल. प्रतीकोपासना आपल्या जीवनात अशा प्रकारचे कृतार्थता व अशा प्रकारचे साफल्य निर्माण करो असे भगवान योगेश्वराच्या चरणापाशी प्रार्थना करूया.
Comments
Post a Comment