चित्त एकाग्रतेत येणारे अडथळे
चित्तएकाग्रतेत मनाचे विक्षेप
1. व्याधी- व्याधी पासून शरीराला सांभाळायचं आहे . शरीर तूच्छ नाही, शरीर मंदिर आहे. शरीर अस्वस्थ असले की मन किंवा बुद्धी अस्वस्थ होते. शरीर अस्वस्थ असेल तर मन काम करत नाही.
2. स्त्यान- म्हणजे चित्ताचे अकर्मन्यता. करण्याची इच्छा आहे पण हातून काही घडत नाही.
3. संशय- परमार्थात शांती ( निवृत्ती ) हवी की प्रवृत्ती? ह्याविषयी आपल्याला शंका आहे. दिवस हवा की रात्र हवी. रात्र ही शांतीची मूर्ती आहे आणि दिवश प्रवृत्तीची मूर्ती आहे आणि दोन्ही नको ही स्थिती तर भगवंत भेटेल तेव्हाच येईल .तोपर्यंत येणार नाही. दोन्ही हवेत असे वाटले की भीती आली. आपण प्रवृत्ती किंवा निवृत्ती त्याच्यातून बाहेरच येत नाही. भगवंता आम्हाला शांती हवी आहे. भगवंता तुझ्या पाशी आहे तशी प्रवृत्ती हवी व तशी शांती हवी. प्रवृत्ती करूनही शांती चलित होत नाही. आणि शांती बाळगूनही प्रवृत्ती चालते. अशी एक वृती तयार झाली पाहिजे.
4.प्रमाद- ज्ञान आहे, बुद्धिमान्य करते आहे. तरी मन काम करत नाही. त्याला प्रमाद म्हणतात. बुद्धीचा मनावर काबू नसतो. तेव्हा प्रमाद घडतो. मन नको म्हणत असतानाही आग्रह करून मनाला समजावण्याने मनाचे स्वास्थ्य वाढते. 5.आलस्य- काम करायचे मनाला वाटते पण इंद्रिये काम करत नाही. साधना करत नाही. प्रयत्न करत नाहीत त्याला आळस म्हणतात. बुद्धि, मन आणि इंद्रिये मिळुन कृती घडते.
6.अविरति- विषय भोगूनही तृप्ती होत नाही. त्याला अविरति म्हणतात.ययाती हे त्याचे उदाहरण आहे. या उलट याज्ञवल्क्य. त्यांच्या जीवनात भोग आणि त्यागाचा समन्वय दिसून येतो.
7.भ्रान्तिदर्शन- भ्रान्ति एक विक्षेप आहे. आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाबद्दल भ्रांती आहे. जोपर्यंत मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माणूस भक्तीचा अधिकारी नाही. माणसाने निसंदेह व निःसंशय व्हायला पाहिजे. गीतेने भ्रांती काढून टाकले आहे. मयावेश्य मनो ये मामा. असे गीता सांगते.
8. अलब्धभूमिकत्व- म्हणजे चित्त सर्व ठिकाणी एकाग्र होते.
9.अनवस्थीतत्व- म्हणजे भगवंतात चित्त एकाग्र होते पण ती एकाग्रता दीर्घकाळ टिकत नाही. निर्गुण निराकारात जाण्यासाठी प्रथम मन मूर्तीत एकाग्र झाले पाहिजे. त्यानंतरच पूर्णतेची अनुभूती मिळते. मूर्तिपूजा आवश्यक आहे. तसेच त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment