सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 2. कोणतीही गोष्ट सुंदर असते ज्यात एक विशिष्ट आहे.


2. Anything is beautiful which has a pecific from
        ते सुंदर आहे की ज्याला काही वैशिष्ट्यपूर्ण आकार आहे. पोटालाही काही विशिष्ट मर्यादा आहे, ती मर्यादा सोडून ज्याचें पोट मोठे होते त्याला कोण सुंदर म्हणेल? ते शोभत नाही. मर्यादा सुटली की सुंदरता निघून जाते. मनालाही आकार असला पाहिजे. मनावर बुद्धीचा हुकूम चालला पाहिजे. परंतु आज मनावर बुद्धीचा हुकूम चालत नाही. उलट बुद्धीवर मनाचा हुकुम चालतो. एखाद्या मुलाला विचारा की काय रे तू शिकायचं का सोडलास? तेव्हा तो म्हणतो की शिकण्यात मन लागत नाही. वास्तविक मनाने बुद्धीच्या हुकूमत राहिले पाहिजे. माणसाच्या बुद्धीत जी गोष्ट उतरत नाही, ती, तो मानत नाही. तुझी बुद्धी केवढी? बुद्धीला देखील एक मर्यादा आहे.
          बुद्धीवादी, बुद्धीजीवी आणि बुद्धीनिष्ठ असे लोकांचे तीन प्रकार आहेत. काही लोक केवळ बुद्धिवादी असतात, ते केवळ वादविवाद करतात.  
     जे बुद्धीत उतरले ते उचलण्याची तयारी खरी तर असतेही,पण बुद्धीत किती उतरते? पुष्कळ गोष्टी बुद्धीत उतरत नाही. पाच वर्षाच्या मुलीच्या बुद्धीत वात्सल्य येत नाही. आपण पण अभ्यास करतो, चार पुस्तक वाचतो, दोन पुस्तके लिहितो आणि बोलू लागत की, ज्ञानेश्वरांचा अनुभव एक कल्पना असेल, मला असे वाटते, माझ्या बुद्धीत असे असे येते. असे बोलणाऱ्याच्या बुद्धीने मर्यादा सोडली आहे. अमुक एक गोष्ट आमच्या बुद्धी उतरत नाही असे म्हणून उडवून देतात. 
चंद्रावर जाणाऱ्याचें पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सुटले आणि अजून चंद्राचे गुरुत्वाकर्षण सुरू झालेले नसते अशावेळी तो जीव राहिला तरी कसा? ही गोष्ट बुद्धीला आकलन होत नाही. बुद्धीत उतरत नाही. त्याची बुद्धी ती गोष्ट स्वीकारू शकत नाही. म्हणून ती घडत नाही असे नाही. बुद्धीला एक मर्यादा आहे. याचा अर्थ असा नाही की बुद्धी चालवायची नाही. मन, बुद्धीला काही मर्यादा आहे. लक्ष्मण रेषा आहे. ज्यांनी मनाची आणि बुद्धीची मर्यादा मान्य केलीय असे जे लोक आहेत त्यांचे जीवन सुंदर आहे. ते भगवंताला आकर्षित करतात. जीवन विकासात ही गोष्ट उपयोगी आहे. पुढच्या भागात

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन