सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 9. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
ही सौंदर्याची फारच सुंदर व्याख्या आहे. ते सुंदर आहे, जे पाहिल्यावर समाजाचे काम होते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही सौंदर्याची व्याख्या कवितेला उद्देशून आहे. हे महापुरुष भगवंताची कविता आहेत. त्यांच्या असण्याने समाजाचे काम होते. शिव आणि हिताचा आग्रह राखून बुद्धी, कर्तुत्वशक्ती वापरणारे ऋषी समाधी लावूनच का बसले नाहीत? त्यांच्यात समाधी लावण्याची शक्ती आहे. ते आत्मनिष्ठ आनंद भोगू शकतात. त्यांना कोणाजवळून कशाचीही गरज नाही, त्यांना पैशाची जरूर नाही; मोठेपणाची जरूर नाही, तरीही ते समाजात सामान्यामधील सामान्य होऊन राहतात. समाज त्यांना मोठे ठरवणारा कोण? समाजात जे मोठमोठे लोक मानले जातात ते पण खुजे असतात. ते या व्यासवाल्मिकीसारख्या महापुरुषांचे मोठेपण कसे समजू शकणार? आदिवासी लोकांमध्ये दोन पुस्तके शिकलेला माणूस गेला तर आदिवासी माणूस तर त्याचे शिकलेला म्हणून वर्णन करतो . जसं पीएचडी झालेला आपल्याला मोठा वाटतो . तसा त्यांना दोन बुक शिकलेला मोठाच वाटतो. जगात विद्येची, तसेच वित्ताची महत्त्ता आहे पण ही गोष्ट मात्र सापेक्ष आहे.
एवढे महान ऋषी, समाधीमध्ये जाऊन आत्मिक आनंद लुटू शकतात. तरीही ते समाजात राहून लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात! म्हणून ते भगवंताला सुंदर वाटतात.
Comments
Post a Comment