अध्यात्मात कश्या पद्धतीने आश्वासने दिली जातात ?
माझ्या आत देव आहे तर मला कळत असे नाही? या विचाराने व्यग्र झालेले लोक अध्यात्माचे अधिकारी आहेत. या विचारानेच अध्यात्माची सुरुवात होते. आत जी तत्वे भरलेले आहेत, देव आत बसला आहे, त्याबाबत विचार करणे, आत असणाऱ्या तत्त्वांचे उन्नतीकरण करणे याचे नाव अध्यात्म.
कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणेल की, ' बेटा! तुला मुक्ती मिळाली' म्हणून काही मुक्ती मिळत नाही. कोणी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला की, 'तुझे ध्यान लागले', म्हणून काही ध्यान लागत नाही. अध्यात्मात अशा गोष्टींना स्थान नाही. त्यामागे काही शास्त्र आहे, विज्ञान आहे. ते समजायला पाहिजे.
एवढ्यासाठीच गीतेत सांगितले आहे बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्धते| अर्जुनाला पण देवाने खोटे आश्वासन दिले नाही की मी तुला मुक्ती देईन. मुक्ती विकसित जीवाची स्थिती आहे. जेव्हा विषयाचा शिक्का बुद्धीत बसत नाही अशी स्थिती येते त्यावेळेस आवड-नावड बंद होते ही सामान्य गोष्ट आहे. ही स्थिती प्राप्त केल्याशिवाय मुक्ती कशी मिळेल? आपण अध्यात्माच्या दृष्टीने मन आणि बुद्धीच्या बाबतीत विचार करत होतो.
Comments
Post a Comment