सौंदर्याच्या पंधरा व्याख्या - 6. कोणतीही गोष्ट सुंदर असते जी आपल्याला भ्रम निर्माण करते.

6. Anything is beautiful which produces us illusion. 
     नाट्य कलेमध्ये आभास दिसतो. चित्रकलेत प्रकृतीचा आभास दिसतो. तसा ज्याच्या जीवनात आभास दिसतो. तो सुंदर आहे. वेदात चमे चमे म्हणत ऋषींनी काय काय मागितला आहे? त्यांना केवढी जीवनासक्ती असेल? त्यांच्या जीवनात जीवनासक्तीचा आभास आसेल. ते सामान्य माणसासारखेच राहताना दिसतात. याज्ञवल्क्यांनी कोणाला विचारले असेल, काय बाबा, सून माहेराहून आली? त्यांचा आणि सुनेचा काय संबंध? पण तरीही विचारतात. 
ऋषी झोपडीत जाऊन शेतकऱ्याला विचारतात की 'तुझी म्हैस व्याली? किती दूध देते? त्यांना हे सर्व विचारण्याची काय गरज आहे? ऋषी शेतकऱ्यांच्या जीवनात वाकून बघतात. कशासाठी?स्वतःच्या जीवनातील प्रसाद त्यांना द्यायचा आहे. त्यांच्या जीवनात सुंगध भरायचा आहे. म्हणून हे महापुरुष वाकून बघतात, तो अभ्यास आहे. लहान बालकाला उचलून घ्यायचा असले तर तुम्हालाच वाकावेच लागते. बालक वरती येत नाही‌. अशाच प्रकारे समाजात कोणाला उचलायचा असेल तर महापुरुषांना वाकावेच लागते. मी माझ्या गादीवर बसेन, ज्याला यायचे असेल त्याने माझ्यापाशी यावे असे ते म्हणत नाहीत. त्यांची वाकायची तयारी आहे तेच असली तत्त्वज्ञानी आहेत. त्यांच्यात जीवनासक्ती दिसते. पण तो आभास आहे म्हणूनच ते सुंदर आहेत. त्यांचे सौंदर्य भगवंताला आवडते. मला पाश्चात्य लोकांनी विचारले. यांनी त्यांच्या जीवनात जीवना सक्ती दिसते ती काय आहे. तो जीवनाशक्तीचा आभास आहे. आणि म्हणूनच तो सुंदर आहे.

  

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.